Cricket Newsआयपीएल 2024क्रीडा

वेगाचा बादशहा य lSG चा युवा तारा ‘मयंक यादव’ कोणाला मानतो आदर्श खेळाडू? स्वतः मयंकने केला खुलासा……

ताज्या बातम्या आणि अपडेट्स Whattsapp वर मिळवण्यासाठी जॉईन करा: Whatsapp Group

=======

लखनऊ सुपर जायंट्सचा युवा वेगवान खेळाडू मयंक यादव सध्या खूपच चर्चेत आहे. आयपीएल मध्ये पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यांमध्ये त्याने पदार्पण केले होते. पदार्पणाच्या सामन्यातच धारदार गोलंदाजी करत संपूर्ण क्रिकेट जगताचे लक्ष वेधून घेतले. पंजाब विरुद्धच्या या सामन्यांमध्ये 12व्या षटकात 156 किलोमीटर वेगाने गोलंदाजी केल्याने तो अचानक सोशल मीडियावर चर्चेत आला.

PBKS vs LSG: भारताला आणखीन एक मिळाला वेगाचा बादशहा, आयपीएल मध्ये सर्वाधिक वेगाने चेंडू टाकून रचला इतिहास..!

बंदुकीच्या गोळीप्रमाणे स्पीड असलेल्या या खेळाडूला कोणाला आदर्श मानतो असे विचारल्यानंतर त्याने जसप्रीत बुमराह किंवा मोहम्मद शमी यांचे नाव घेतले नाही तर, दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज त्याचा आदर्श खेळाडू असल्याचे सांगितले.

 

हा गोलंदाज आहे मयंक यादवचा आदर्श.

मयंक यादवने पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात धडाकेबाज कामगिरी केल्याने लखनऊच्या संघाला दोन महत्त्वपूर्ण गुण मिळाले. पंजाबने 10 षटकात एकही विकेट न गमवता 100 धावा केल्या होत्या. बाराव्या षटकात मयंक यादव गोलंदाजीसाठी आला आणि त्याने सामना लखनऊच्या बाजूने फिरवला. त्याने चार षटकात 27 धावा देतील महत्त्वपूर्ण 3 गडी बाद केले. बाराव्या षटकामध्ये तो गोलंदाजी करण्यासाठी आला होता, तेव्हा त्याने 155.8 च्या स्पीडने चेंडू टाकला. शिखर धवन या चेंडूला खेळू देखील शकला नाही. तो चेंडू बीट केला.

मयंकने या षटकात सलग तीन चेंडू 150 पेक्षा अधिक स्पीडने चेंडू टाकले. लखनऊने सामना जिंकल्यानंतर या खेळाडूला आदर्श कोणाला मानतो असे विचारल्यानंतर त्याने भारत ऐवजी आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन हा फेवरेट असल्याचे सांगितले.

पंजाब आणि लखनऊ यांच्यात झालेल्या सामन्यानंतर मयंक यादव याची देशभर चर्चा होऊ लागली. भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी देखील या खेळाडूचे तोंड भरून कौतुक केले आहे. मांजरेकर म्हणाले की, पाकिस्तान जो एकेकाळी करत होता, मयंक तेच करत आहे. या खेळाडूचा स्पीड पाहून मी खूपच उत्साही झालो आहोत. यासह या पूर्व दिग्गज खेळाडूने मयंकला भारताचा शोएब अख्तर असे देखील म्हटले आहे. आयपीएल मध्ये त्याची कामगिरी अशीच दमदार राहिली तर तो लवकरच भारतीय क्रिकेट संघात पदार्पण करू शकतो.

मयंक यादव यांचा जन्म 17 जून 2002 मध्ये दिल्ली येथे झाला होता. तो दिल्लीकडून स्थानिक क्रिकेट खेळतो. दिल्ली येथील सोनेट क्लब कडून त्याने क्रिकेटचे धडे घेतले आहेत. यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत, शिखर धवन व आशिष नेहरा देखील याच क्लबचे खेळाडू आहेत. लखनऊ सुपर जायंट्सने मयंक यादव याला आयपीएल 2022 मध्ये आपल्या संघात सामील केले होते. 20 लाख रुपयाच्या बेस प्राईज मध्ये त्याला खरेदी करण्यात आले. 2023 मध्ये तो दुखापतीमुळे बाहेर पडला.

मयंक यादवने यंदाच्या हंगामात आयपीएल मध्ये पदार्पण करून धमाकेदार कामगिरी करत साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. मयंक हा दिल्लीच्या एका सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेला मुलगा आहे. लॉकडाऊनच्या काळात त्याच्या वडिलांचा व्यवसाय देखील बुडून गेला. त्यामुळे त्याच्याकडे क्रिकेट खेळण्यासाठी बूट देखील नव्हते. त्यावेळी त्याच्या मदतीला सोनेट क्रिकेट क्लब धावून आला. त्याच्यासाठी खास बूट बनवण्याची ऑर्डर दिली होती. आज तो भारतीय क्रिकेटमध्ये स्टार खेळाडू बनला.

वेगाचा बादशहा य lSG चा युवा तारा 'मयंक यादव' कोणाला मानतो आदर्श खेळाडू? स्वतः मयंकने केला खुलासा......

मयंक यादवने मागील वर्षी झालेल्या 23 वर्षाखालील कर्नल सीके नायडू स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली. सहा सामन्यात त्याच्या नावे 15 विकेट घेतल्याची नोंद आहे. छत्तीसगड विरुद्धच्या एका सामन्यात त्याने पाच बळी देखील घेतले होते. या सोबतच फलंदाजीत त्याने 66 धावांचे योगदान दिले. तसेच त्याने 17 लिस्ट ए आणि 10 टी-20 सामने खेळले आहेत. यात त्याने अनुक्रमे 5.35 च्या सरासरीने 34 आणि 6.44 च्या सरासरीने 12 विकेट घेतले आहेत.

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2023-24 मध्ये देखील मयंकने धमाकेदार कामगिरी केली. स्पर्धेतील चार सामन्यात त्याने पाच विकेट घेतले. याबरोबरच विजय हजारे ट्रॉफी मध्ये देखील पाच सामन्यात सहा विकेट घेतले. 2023 देवधर ट्रॉफी मध्ये नॉर्थ झोन कडून खेळताना पाच सामन्यात 12 विकेट घेतल्याची नोंद आहे.


====

आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

 

IPL 2024: मुंबई इंडियन्सने अचानक केला संघात बदल, या दिग्गज खेळाडूला बाहेर काढून या इंग्लंड च्या खेळाडूला दिली संधी.

IPL 2024: यॉर्कर स्पेशालिस्ट ‘जसप्रीत बुमराह’ आयपीएलसाठी पूर्णपणे फिट; यंदाच्या आयपीएल मध्ये या तीन विक्रमावर असेल नजर…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button