- Advertisement -

सतत फ्लॉप होऊनही के.एल. राहुलला संघात जागा देऊन बीसीसीआय ‘या’ 3 खेळाडूंचे करिअर करतेय बर्बाद, एकजण तर आहे ताबडतोब फोर्ममध्ये..!

0 0

सतत फ्लॉप होऊनही केएल. राहुलला संघात जागा देऊन बीसीसीआय ‘या’ 3 खेळाडूंचे करिअर करतेय बर्बाद, एकजण तर आहे ताबडतोब फोर्ममध्ये..!


‘केएल राहुलचे टीम इंडियात सामील होणे’ आता एक न उलगडलेले गूढ बनले आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात सुरू असलेल्या 4 कसोटी सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर मालिकेतील पहिले दोन कसोटी सामने खेळले गेले आहेत. दोन्ही कसोटी जिंकून भारताने मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. गेल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कर्णधार रोहित शर्मा, मोहम्मद शमी आणि सिराज या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sanju V Samson (@imsanjusamson)

पण लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर या खेळाडूंना मिळालेल्या संधींचा फायदा उठवता आलेला नाही आणि ते फ्लॉप होत आहेत. गेल्या दोन कसोटी सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. ज्यामध्ये केएल राहुलला संघातून वगळले जाईल, अशी सर्वांना अपेक्षा होती, पण ते शक्य झाले नाही.म्हणूनच अनेक लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्याच्या मते राहुल नाही तर भारतीय संघामध्ये सध्या खालील 3 खेळाडूंपैकी एकाला संधी द्य्याला हवी. चला तर जाणून घेऊया कोणते आहेत ते खेळाडू..

संजू सॅमसन: गेल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये ईशान किशनला प्राधान्य देत श्रीकर भरतला टीम इंडियात यष्टिरक्षक फलंदाज म्हणून संधी देण्यात आली होती, पण भारताला त्याच्या फलंदाजीने छाप पाडता आलेली नाही. तसेच, इशान किशनचा अलीकडचा फॉर्मही निराशाजनक ठरला आहे, त्यामुळे पुढील दोन कसोटी सामन्यांसाठी संजू सॅमसन भारतीय संघात परतण्याची शक्यता आहे.

सॅमसनने अलीकडेच आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत धावा केल्या आहेत. त्याच्याकडे लांबलचक खेळी खेळण्याची क्षमता आहे, त्यामुळे त्याची टीम इंडियात एन्ट्री होऊ शकते. सलामीवीर के.एल. राहुलची कामगिरी पाहता त्याच्या जागी संघात खेळण्याचा हकदार संजू होता असं म्हटल्यास वावग ठरणार नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mayank Agarwal (@mayankagarawal)

मयंक अंगरवाल: या यादीत दुसरा खेळाडू आहे तो म्हणजे मयंक अगरवाल.  केएल राहुलच्या सातत्याने खराब कामगिरीमुळे त्याचे संघातील स्थान धोक्यात आले आहे. त्यामुळे पुढील दोन कसोटी सामन्यांसाठी त्याच्या जागी मयंक अग्रवाल सलामीवीर म्हणून टीम इंडियात परत येऊ शकतो. मयंक अग्रवालने यापूर्वी कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी सलामी दिली आहे. मयंक अग्रवालने रणजी ट्रॉफी 2022-2023 मध्ये सर्वाधिक 990 धावा केल्या आहेत, ज्यात 3 शतके आणि 6 अर्धशतकांचा समावेश आहे. या शानदार कामगिरीच्या जोरावर मयंकने तब्बल 1 वर्षानंतर भारतीय संघात पुनरागमन करण्याचा जोरदार दावा केला आहे.

बीसीसीआय

सरफराज खान: ज्या खेळाडूच्या भारतीय संघात पुनरागमनाची अनेक दिवसांपासून मागणी होती, त्याचे नाव सरफराज खान आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये गेल्या तीन वर्षांत सरफराज खानपेक्षा कोणत्याही फलंदाजाने जास्त धावा केल्या नाहीत. असे असूनही तो निवडकर्त्यांच्या नजरेपासून दूर राहिला आहे. पहिल्या कसोटीत सूर्यकुमार यादव आणि दुसऱ्या कसोटीत श्रेयस अय्यरच्या फ्लॉपनंतर मधल्या फळीत फलंदाजीचा एक चांगला पर्याय म्हणून सरफराज खानचा संघात समावेश केला जाऊ शकतो. सरफराज खानने या रणजी हंगामातील 6 सामन्यात 92.66 च्या सरासरीने 556 धावा केल्या आहेत.


हेही वाचा:

दुसऱ्या कसोटीत झालेल्या मोठ्या पराभवानंतर ऑस्ट्रोलीया संघाला आणखी एक मोठा धक्का, ‘या कारणामुळे कर्णधार पॅट कमिन्स परतला मायदेशी..!

‘या’ गोलंदाजाची धुलाई करत चेतेश्वर पुजाराने बनवलाय वर्ल्ड रेकॉर्ड! असा कारनामा करणारा ठरलाय पहिला फलंदाज

Leave A Reply

Your email address will not be published.