‘लो ये भी गया’ सराव करतांना भारतीय संघाचा कर्णधार केएल राहुल जबर जखमी, नेटमध्ये फलंदाजी करतांना हाताला झाली जखम.. राहुल द्रविडने स्पष्टचं सांगितले..
टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या वनडेदरम्यान जखमी झाला होता. त्यानंतर या दौऱ्यावर संघाची कमान केएल राहुलकडे होती. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात आणि पहिल्या कसोटी सामन्यात दणदणीत विजय मिळवला.
मात्र त्याचवेळी दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. नुकत्याच आलेल्या वृत्तानुसार, कर्णधार केएल राहुल दुखापतग्रस्त झाला आहे.

दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी केएल राहुल उपलब्ध नसणार?
बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटीत भारत केएल राहुलशिवाय मैदानात उतरू शकतो. या सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. खरेतर, ईएसपीएनने दिलेल्या वृत्तानुसार, केएल नेट प्रॅक्टिस दरम्यान जखमी झाला. फलंदाजीचा सराव करताना त्याच्या हाताला दुखापत झाली आहे.
🚨 KL Rahul took a blow on his hand in nets!@klrahul @BCCI @cricket #cricketlovers #BANvsIND #Cricket #KLRahul pic.twitter.com/GExWxP53tV
— the_cricket_web (@the_cricket_web) December 21, 2022
भारताचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठौर यांनी बुधवारी राहुलच्या दुखापतीबाबत माहिती दिली. मात्र, राहुल पुढच्या सामन्यात खेळणार की नाही हे त्यांनी सांगितले नाही. पत्रकार परिषदेत बोलताना विक्रम म्हणाले,
“इजा गंभीर नाही. तो बरोबर दिसत आहे. आशा आहे की तो सामन्यापूर्वी पूर्णपणे बरा होईल. डॉक्टर त्याची काळजी घेत आहेत.
Warming up for Day 4 💪💪#BANvIND pic.twitter.com/4SJ4XoNU95
— BCCI (@BCCI) December 17, 2022
केएल राहुलच्या अनुपस्थितीत हा खेळाडू कर्णधारपद भूषवू शकतो
रोहित शर्मा देखील पुढील सामन्यासाठी संघाचा भाग असणार नाही. अशा परिस्थितीत केएल राहुलला संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. आता या सामन्यासाठी राहुलही उपलब्ध नसेल तर त्याच्या जागी चेतेश्वर पुजारा संघाचे नेतृत्व करेल.
कारण या मालिकेसाठी त्याची टीम इंडियाचा उपकर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. केएल राहुलच्या नेतृत्वाखाली भारताने मालिकेतील पहिली कसोटी १८८ धावांनी जिंकली. अशा परिस्थितीत त्याच्या चाहत्यांना लवकरात लवकर तो बरे होण्याची आशा असेल.