Cricket News

World cup Records: हे’आहेत विश्वचषकात शतक ठोकणारे युवा खेळाडू; सचिनने वयाच्या या वर्षी ठोकले होते शतक.

 

 World cup Records: विश्वचषकासारख्या आयसीसीच्या मोठ्या इव्हेंटकडे जगभरातल्या क्रीडा प्रेमींच्या नजरा लागून राहिलेल्या असतात. या स्पर्धेमध्ये अनुभवी खेळाडूंसह युवा खेळाडूदेखील दमदार कामगिरी करून आपली छाप सोडण्याचा प्रयत्न करत आहेत. आज आपण विश्वचषक स्पर्धेत सर्वात कमी वयात शतक ठोकणाऱ्या युवा खेळाडूंची माहिती पाहणार आहोत. (Younger players who smashed century in wrold cup )

 World cup Records: या युवा खेळाडूंनी विश्वचषक स्पधेमध्ये ठोकलेत शतक. . (Younger players who smashed century in world cup )

पॉल स्टर्लिंग: आयर्लंडचा फलंदाज पॉल स्टर्लिंग हा विश्वचषक स्पर्धेत सर्वात कमी वयात शतक ठोकणारा खेळाडू आहे. त्याने 2011 च्या विश्वचषकात इंग्लंड विरुद्ध खेळताना हे शतक ठोकले होते. त्यावेळी त्याचे वय 20 वर्षे 196 दिवस होते. इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात शतकी खेळी करून त्याने साऱ्यांना चकित करून टाकले होते.

 रिकी पॉंटिंग:  ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंग हा देखील या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने वयाच्या 21व्या वर्षी शतक ठोकले होते. याच खेळाडूने आपल्याच नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाला दोनदा विश्व चॅम्पियन बनवले होते. तो ऑस्ट्रोलियाच्या सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक मानला जातो.

विराट कोहली  World cup Records

 अविष्का फर्नांडो: श्रीलंकेचा धडाकेबाज फलंदाज अविष्का फर्नांडो याने 21 वर्षे 87 दिवस असताना शतक ठोकले होते. अशी कामगिरी करणारा श्रीलंकेचा एकमेव फलंदाज आहे. विश्वचषकात सर्वात कमी वयाच्या खेळाडूंमध्ये

विराट कोहली : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली याने 22 वर्ष 106 दिवसांचा असताना शतक ठोकले होते. त्याने ही किमया 2011 सालच्या विश्वचषकात बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात केली होती.

World cup Records: हे'आहेत विश्वचषकात शतक ठोकणारे युवा खेळाडू; सचिनने वयाच्या या वर्षी ठोकले होते शतक.
(Youngest players who smashed century in wrold cup )

 सचिन तेंडुलकर: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने केनियाविरुद्ध खेळताना शतक ठोकले होते. त्यावेळी त्याचे वय 22 वर्ष 300 दिवस होते. त्यानंतर सचिनने पुन्हा एकदा शतक ठोकण्याची किमया केली होती. श्रीलंकेविरुद्ध खेळताना त्याने हे शतक ठोकले होते. त्यावेळी त्याचे वय 22 वर्ष 313 दिवस असे होते.

एबी डिव्हिलियर्स: दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज एबी डिव्हिलियर्स याने 23 वर्षे 52 दिवसाचा असताना विश्वचषक स्पर्धेत शतक ठोकले होते. त्याच्या लक्षवेधी खेळीमुळे तो अचानक प्रकाश झोतात आला होता.

Younger players who smashed century in world cup

क्रिस गेल: वेस्टइंडीज चा विस्फोटक फलंदाज क्रिस गेलने 23 वर्ष 164 दिवसाचा असताना विश्वचषक स्पर्धेत शतक ठोकले होते. त्याच्या कारकिर्दीत त्याने जागतिक स्तरावर गोलंदाजांवर एक वेगळाच धाक निर्माण केला होता.

इमाम उल हक: या विक्रमाच्या यादीत पाकिस्तानच्या एकमेव खेळाडूंचे नाव आहे ते म्हणजे इमाम उल हक. तो 23 वर्ष 195 दिवसाचा असताना शतक ठोकला होता.

वरील सर्व खेळाडूंनी कमी वय असतांना विश्वचषकामध्ये शतक ठोकून आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन दाखवले होते.


हेही वाचा:

शुभमन गिल नंतर आणखी एका भारतीयला झाली डेंग्यूची लागण; पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी आली मोठी धक्कादायक बातमी!

पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिल विषयी मिळाली मोठी अपडेट; वाचा काय आहे बातमी..

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button