शानदार..! विराट-धोनीला जमले नाही ते केएल राहुलने करून दाखवले,कर्णधार म्हणून टीम इंडियासाठी केली अशी कामगिरी..!
भारतीय क्रिकेट संघाने शुक्रवारी तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 5 गडी राखून पराभव करून आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थान गाठले आहे. कसोटी आणि टी-20 तसंच वनडेमध्येही भारत आता पहिल्या क्रमांकावर आहे. अशी कामगिरी करणारा टीम इंडिया हा आशियातील पहिला संघ ठरला आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचे 277 धावांचे आव्हान 5 गडी गमावून पूर्ण केले. भारतीय संघ 42 सामन्यांत 4864 गुण आणि 116 रेटिंग गुण मिळवून अव्वल स्थानावर पोहोचला आहे. भारत, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील अव्वल स्थानासाठीची ही लढाई भारताने 1 गुणाने जिंकली आहे. पाकिस्तानचे 29 सामन्यांत 3231 गुण आणि 115 रेटिंग गुण आहेत, ते सध्या दुसऱ्या स्थानावर आहेत.
कसोटी आणि टी-२० मध्येही भारत संघ क्रमवारीत अव्वल आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेबद्दल बोलायचे झाले तर, तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना जिंकून भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. आता मालिकेतील दुसरा सामना 24 सप्टेंबरला इंदूरमध्ये तर तिसरा आणि शेवटचा सामना 27 सप्टेंबरला राजकोटमध्ये खेळवला जाईल.
केएल राहुलने रचला इतिहास
या विजयासह केएल राहुलने इतिहास रचला आहे. 1996 नंतर मोहाली येथील पंजाब क्रिकेट असोसिएशन आयएस बिंद्रा स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा हा पहिला एकदिवसीय विजय होता. गेल्या वेळी सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखाली भारताने ऑस्ट्रेलियन संघाचा येथे पराभव केला होता. मोहालीमध्ये ऑस्ट्रेलियाचा अजूनही चांगला रेकॉर्ड आहे आणि त्यांनी येथे खेळल्या गेलेल्या शेवटच्या 7 एकदिवसीय सामन्यांपैकी 6 जिंकले आहेत. 3 नोव्हेंबर 1996 रोजी मोहाली येथे खेळल्या गेलेल्या टायटन कप सामन्यात ब्लू जर्सी संघाने ऑस्ट्रेलियाचा 5 धावांनी पराभव केला. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार सचिन तेंडुलकर होता. या मालिकेतील तिसरा संघ दक्षिण आफ्रिका होता.
राहुलच्या आधी महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांनीही मोहालीत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात भारताचे नेतृत्व केले होते, परंतु त्यांना पराभवाची चव चाखावी लागली होती. पराभवाची ही मालिका संपुष्टात आणण्यात के.एल. राहुलला यश आल्याने विजयाबरोबरच भारतीयांनाही आनंदोत्सव साजरा करावासा वाटत असेल, यात काही शंका नाही.
हेही वाचा:
शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..