शानदार..जबरदस्त…जिंदाबाद…कर्णधार केएल राहुलने मारला एवढा जबरदस्त षटकार की चेंडू थेट मैदानाच्या बाहेर,व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल.
काल भारत आणि ऑस्ट्रोलीया यांच्यातील दुसरा एकदिवशीय सामना इंदोरच्या होळकर मैदानावर खेळवला गेला. ज्यात टीम इंडियाने ऑस्ट्रोलीयाचा पराभव करत या सामन्यासह 3सामन्याची मालिका ही आपल्या नावावर केली. भारतीय संघाचे फलंदाज आणि गोलंदाज दोन्ही खेळाडूंनी लौकिकाला साजेशी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करत असतांन भारताचा कर्णधार ‘केएल राहुल’ चांगल्या फॉर्ममध्ये दिसला. त्याने 38 चेंडूत 52 धावा करत झटपट अर्धशतक झळकावले. कर्णधार राहुलच्या या खेळीत ३ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. राहुलने आपल्या डावात इतका जोरात षटकार मारला की चेंडू मैदानाबाहेर पडला.
कर्णधार राहुलने मारला जबरदस्त षटकार, बीसीसीआयने शेअर केला व्हिडीओ..
राहुलच्या या मॉन्स्टर सिक्सचा व्हिडिओ बीसीसीआयच्या अधिकृत सोशल मीडियावरून शेअर करण्यात आला आहे. राहुल ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज कॅमेरून ग्रीनच्या चेंडूला डीप मिड-विकेटच्या दिशेने मारत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. राहुलच्या बॅटला लागल्यानंतर चेंडू थेट स्टेडियमच्या बाहेर पडला. पहिल्या डावातील 34व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर राहुलने हा षटकार लगावला.
पहा व्हिडीओ
Brutal shot🥵#KLRahul pic.twitter.com/MsHYnO90sg
— Pavan (@Pardhu013) September 24, 2023
राहुलने गेल्या पाच डावांमध्ये एक शतक आणि दोन अर्धशतके झळकावली.
10 सप्टेंबर रोजी आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात दुखापतीनंतर केएल राहुल अनेक महिन्यांनंतर क्रिकेटच्या मैदानात परतला. तो परत येताच राहुलने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात १११* धावांची नाबाद खेळी खेळली. त्यानंतर आशिया कपमध्ये त्याने श्रीलंकेविरुद्ध ३९ आणि बांगलादेशविरुद्ध १९ धावा केल्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये त्याने अर्धशतके झळकावली. मोहाली येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात धावांचा पाठलाग करताना त्याने नाबाद 58* आणि दुसऱ्या सामन्यात 52 धावा केल्या.
हे पण वाचा:
शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..