आज जो मेरी तारीफ कर रहे हैं, कल तक वही लोग मुझे गाली दे रहे थे..” शानदार शतक ठोकल्यानंतर केएल राहुलने केले मोठे वक्तव्य..

आज जो मेरी तारीफ कर रहे हैं, कल तक वही लोग मुझे गाली दे रहे थे.." शानदार शतक ठोकल्यानंतर केएल राहुलने केले मोठे वक्तव्य..

केएल राहुल:  दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (IND vs SA) सेंच्युरियन कसोटी सामन्यातील शतकानंतर टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. चाहत्यांच्या दुटप्पी वृत्तीवर त्याने  टीका केली आहे. केएल राहुलच्या म्हणण्यानुसार, आज सोशल मीडियावर जे लोक त्याची स्तुती करत आहेत तेच लोक काही काळापूर्वी त्याला खूप ट्रोल करत होते. केएल राहुलच्या मते, सोशल मीडियावर ट्रोल केल्याने खेळाडूंमध्ये खूप फरक पडतो.

IND vs SA LIVE: केएल राहुलने ठोकले शानदार शतक,महेंद्रसिंह धोनीचा विक्रम मोडीत आफ्रिकेत अशी कामगिरी करणारा ठरला पहिला फलंदाज..

सेंच्युरियन कसोटी सामन्यात केएल राहुलने शानदार शतक झळकावून भारताला संकटातून बाहेर काढले होते. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. संघाने केवळ 121 धावांवर 6 विकेट गमावल्या आणि येथून 150 धावा करणे कठीण झाले. मात्र, मधल्या फळीत फलंदाजीला आलेला केएल राहुल एका टोकाला राहिला आणि त्याने खालच्या फळीतील फलंदाजांसह संघाला चांगल्या धावसंख्येपर्यंत नेले.

सोशल मीडिया ट्रोलिंगमुळे खूप फरक पडतो – केएल राहुल

दिवसाचा खेळ संपल्यानंतर केएल राहुलला विचारण्यात आले की ,सोशल मीडिया ट्रोलिंगमुळे त्याच्यावर काही फरक पडला आहे का आणि आता तो त्यांना उत्तर देईल का. तर या प्रश्नाच्या उत्तरात राहुल म्हणाला,

आज जो मेरी तारीफ कर रहे हैं, कल तक वही लोग मुझे गाली दे रहे थे.." शानदार शतक ठोकल्यानंतर केएल राहुलने केले मोठे वक्तव्य..

असे केल्याने मला काय फायदा होईल? लोकांना जे म्हणायचे आहे ते म्हणतील. जर तुम्ही पब्लिक परफॉर्मर असाल तर प्रदर्शन करूनच तुम्ही टीका टाळू शकता. आज जे लोक माझी स्तुती करत आहेत तेच काही महिन्यांपूर्वी मला शिव्या देत होते. सोशल मीडियामुळे त्यांना काही फरक पडत नाही असे कोणी म्हणतो तो खोटे बोलतो. मात्र, तुम्ही यापासून जितके दूर राहाल, तितके तुमच्या मानसिकतेसाठी चांगले होईल.

केएल राहुलने 137 चेंडूत 101 धावांची खेळी करत टीम इंडियाला लवकर ऑलआऊट होण्यापासून वाचवले. राहुलच्या शतकीय खेळीमुळे टीम इंडिया 245 धावापर्यंत पोहचू शकली..


हेही वाचा:

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दीपक चहरच्या जागी भारतीय संघात खेळणार ‘आकाश दीप’ कोण आहे? वडील आणि भावाचे निधन, आईने मेहनत करून बनवले क्रिकेटर..

कारकीर्द कितीही वादाची असली तरीही, ‘सनथ जयसूर्या’ खेळाडू जबराटचं होता…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *