रस्त्यावर सापडलेले तब्बल ‘१० तोळे सोने’ या गरीब जोडप्याने केले परत, प्रामाणिकपणा पाहून सर्वच जण करताहेत कौतुक..
आजकालच्या जीवनात सध्या कोणावरही विश्वास ठेवावं, अस वाटत नाही. कधी कोण कुठे धोका देईल याचा काहीही नेम नाही. मात्र आजच्या या युगात हि असे काही प्रामाणिक लोक राहतात. ज्यांच्या प्रमाणिक पनांची उदाहरणे त्या लोकांसाठीखूपच कामाची आहे जे फुकट मिळव म्हणून लोकांना लुबाडण्याच्या विचारात असतात.
अश्याच एका प्रामाणिक जोडप्याची एक कहाणी सध्या सोशल मिडीयावर जोरदार चर्चेत आहे. कोल्हापूरमध्ये राहणाऱ्या या जोडप्याने प्रामाणिकपनाचे एक नवीन उदाहरण निर्मान केले आहे. आजच्या दिवसांत कुणी फुकट मिळालेला एक रुपयासुद्धा सोडत नाही. अंतर या जोडप्याने तब्बल १० तोळे सोने म्हणजे जवळपास तीन लाख रुपयांचा ऐवज स्वतः शोध घेत त्या माणसाला परत केला आहे.त्यांच्या
या कामाची संध्या कोल्हापूरसह अवघ्या महाराष्ट्रभर चर्चा आहे..
बँकेचे थकलेल हफ्ते फेडण्याच्या दृष्टीने ‘तानाजी देसाई’ यांनी त्यांच्या जवळचे दागिने बँकेत गाहाण ठेवण्याचे ठरवले होते. आपल्या घरातून दोन प्रतिज्ञापत्र आणि तब्बल १० तोळे सोने घेऊन ते रस्त्यावरून जात असतांना त्यांच्या गाडीच्या डिकीतील दागिने आणि प्रतिज्ञापत्र ररस्त्यावर पडले. काही वेळानंतर तेथून जात असलेले विशाल मोरे यांना राधानगरी रोडवरही वस्तू रस्त्यावर बेवारस अवस्थेत आढळली. रुमाल उघडून पाहिल्यानंतर त्यांना त्यात भरपूर सोन्याचे दागिने आणि दोन प्रतिज्ञापत्र दिसून आली.
लगेच त्यांनी हा प्रकार आपल्या पत्नीला फोन करून सांगितला.

त्यांतर दोघेही घटनास्थळी जमले.रुमालात असललेल्या प्रतिज्ञापत्रावर तानाजी देसाई यांचे नाव आणि मोबाईल नंबर आठळून आला.परंतु त्यांना संपर्क करता त्यांनी काहीही प्रतिसाद दिला नाही. जेव्हा त्यांच्या लक्षात आले कि आपले दागिने हरवले आहेत. तेव्हा त्यांनी तातडीने पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. यादरम्यान हि गोष्ट त्यांच्या घरच्यांना सुद्धा कळली आणि सगळेच चिंतेत पडले.
इकडे मोरेंनी पुन्हा त्यांना संपर्क करून तुमचे दागिने आम्हाला मिळाले असल्याची माहिती कळवली. आणि आपण स्वतः तुम्ही असलेल्या पोलीस स्टेशन मध्ये दाखव होत आहोत,अस सांगितले. हरवलेले दागिने पुन्हा मिळाल्याने मोरे दाम्पत्यांचे आभार त्यांनी मानले. आणि प्रमाणिक पना दाखवल्यामुळे स्वतः पोलीस अधिकार्यांनीही मोरे दाम्पत्यांची स्तुती करत कौतुक केले.
मोरे दाम्पत्यांच्या प्रामाणिक पणामुळेचे आज देसाईचे दागिने त्यांना परत मिळाले, ज्यामुळे सगळीकडे या जोडप्याची चर्चा आणि स्तुती होत आहे..
हेही वाचा: