Viral Video: एमएस धोनी झाला 17 वर्षाच्या युवा गोलंदाजाचा फॅन; श्रीलंकेहून दाखल होणार सीएसकेच्या संघात ,गोलंदाजीचा व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

IPL 2024: एमएस धोनी झाला 17 वर्षाच्या युवा गोलंदाजाचा फॅन; श्रीलंकेहून दाखल होणार सीएसकेच्या संघात,गोलंदाजीचा व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

IPL 2024: श्रीलंकेमधील एका 17 वर्षीय युवा खेळाडूचा गोलंदाजी करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. वायरल झालेला हा व्हिडिओ एमएस धोनी  पर्यंत पोहोचला आहे . धोनी देखील या खेळाडूची गोलंदाजी पाहून फारच प्रभावित झाला आहे. माही ने या युवा खेळाडूला भारतामध्ये बोलवले असून तो आता चेन्नई सुपर किंग्सच्या नेट सेशनमध्ये सहभागी होणार आहे. कुलादास मथुलान असं या गोलंदाजाचे नाव आहे.

पहा व्हायरल व्हिडीओ.

कुलादासचा गोलंदाजी करतानाचा व्हिडिओ प्रचंड वायरल होत आहे. तो व्हिडिओ पाहून प्रत्येकजण त्याच्या गोलंदाजीचे कौतुक करत आहे. कुलादासने टाकलेला चेंडू इतका धारदार होता की, तो फलंदाजाला चकवा देत क्लीन बोल्ड करतो. विशेष म्हणजे हा चेंडू खेळताना फलंदाज देखील त्याचा बॅलन्स बिघडल्याने खेळपट्टीवर कोसळला. त्याचा चेंडू खूपच वेगात होता त्यामुळे चेंडू फलंदाजाला बिट करत मधल्या स्टंपच्या दिशेने गेला.

कुलदासची वैशिष्ट्य म्हणजे त्याची गोलंदाजी शैली ही लसिथ मलिंग सारखी आहे. लसीथ मलिंगा त्याच्या करिअरच्या सुवर्ण काळात तशी गोलंदाजी करत होता. त्यामुळे आता कुलादासला प्रति मलिंगा म्हटले जाऊ लागले आहे.

IPL 2024: एमएस धोनी झाला 17 वर्षाच्या युवा गोलंदाजाचा फॅन; श्रीलंकेहून दाखल होणार सीएसकेच्या संघात,गोलंदाजीचा व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

आता कुलादास मथुलान एम एस धोनीच्या नेतृत्वाखाली नेट्स मध्ये गोलंदाजी करताना दिसून येईल. कुलादास ने जर महेंद्रसिंग धोनीला गोलंदाजी करून प्रभावित केले तर, श्रीलंकेच्या या युवा गोलंदाज चेन्नई सुपर किंग्स संघात एन्ट्री व्हायला वेळ लागणार नाही. धोनीची एक खास बात म्हणजे युवा खेळाडू मध्ये असलेली प्रतिभा शोधून त्यांना संधी देणे. धोनी मागच्या अनेक वर्षांपासून ही कामगिरी पार पाडतोय.


==

आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *