कुलदीप सेन: इंडियन प्रीमियर लीग (IPL) ही भारतीय खेळाडूंसाठी असा प्लॅटफॉर्म आहे, जिथे एकदा का आपल्यातली प्रतिभा दाखवली तर, भारतीय संघामध्ये प्रवेशासाठीचे दार उघडले जाते. तसेच खराब कामगिरीबाहेर संघाबाहेर पडलेल्या खेळाडूंसाठी ही पुनरागमनाची चांगली संधी आयपीएलमधून मिळते. कुलदीप सेन यांच्या बाबतीत देखील सेम असेच घडले आहे. हा तोच कुलदीप सेन आहे ज्याला भारतीय क्रिकेट संघाकडून खेळताना एकदा संधी मिळाले होती. त्यानंतर निवड समितीने समितीला त्याच्या नावाचा विसर पडला.
कुलदीप सेनने 2022 साली खेळला होता शेवटचा टीम इंडियासाठी सामना…
बांगलादेश विरुद्ध 2022 साली झालेल्या एका आंतरराष्ट्रीय वनडे सामन्यात त्याला पदार्पणाची संधी मिळाली होती. मात्र पुन्हा त्याला कधीच संधी भेटली नाही. कुलदीप सेन हा टीम इंडिया मध्ये पुनरागमन करण्यासाठी धडाकेबाज कामगिरी करतोय. नुकत्याच झालेल्या आयपीएल सामन्यांमध्ये त्याच्या गोलंदाजीची धार पुन्हा जगाला दिसून आली.
आयपीएल 2024 मधील 24 व्या सामन्यात कुलदीप सेन याने राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात संधी मिळाली. त्याने चार षटकात 41 धावा देत तीन महत्त्वपूर्ण गडी बात करत एकच खळबळ माजवली. यासह कुलदीप सतत 145 च्या स्पीडने गोलंदाजी करत होता. गुजरात टायटन्स विरुद्धच्या या सामन्यात त्याने साई सुदर्शन, मॅथ्यू वेड व अभिनव मनोहर यासारख्या धुरंदर फलंदाजाचे विकेट घेतले होते. त्याचा हा परफॉर्मन्स निवड समितीला विचार करायला भाग पाडणारा असा आहे. विशेष म्हणजे त्याने घेतलेले कालच्या सामन्यातले 3 विकेट हे क्लीन बोल्ड होते.
कुलदीप सेन याला राजस्थान रॉयल्स ने 2022 मध्ये 20 लाख रुपयांच्या बेस्ट प्राईस मध्ये खरेदी करत आपल्या संघासोबत जोडले होते. मागील हंगामात त्याने सात सामन्यात तीन विकेट घेत सर्वसाधारण कामगिरी केली होती. 2023 मध्ये त्याला केवळ दोनच सामन्यात खेळण्याची संधी मिळाली ज्यात त्याला एकही विकेट घेता आली नाही.
यंदाच्या हंगामात कुलदीप सेनला काल एकाच सामन्यात खेळण्याची संधी मिळाली.
कुलदीप सेन हा मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यातून येतो. 27 वर्षाच्या या वेगवान गोलंदाजाने रणजी क्रिकेटमध्ये तमिळनाडू क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले होते. फर्स्ट क्लास क्रिकेटच्या 20 सामन्यात त्याच्या नवे 55 विकेटची नोंद आहे तर लिस्ट ए च्या 14 सामन्यात 27 गडी बाद केले आहेत. टी ट्वेंटी क्रिकेट मधील 37 सामन्यात त्याला 29 विकेट घेण्यात यश मिळाले.
हेही वाचा:
- ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत.
- .शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..
- टेलेंट असूनही या 4 खेळाडूंना कधीही संघात जागा मिळाली नाही, एकाने तर केले होते जबरदस्त प्रदर्शन तरीही केवळ 2 वर्षचं टिकली क्रिकेट कारकीर्द..