महाभारत: महाभारतात कुंती हे पात्र तर सर्वांनाच माहिती असेल. अभिनेत्री नाजनीनने 90 च्या दशकात बी. आर. चोप्रा यांच्या महाभारतमध्ये कुंतीची भूमिका साकारली होती. बी आर चोप्रांच्या महाभारताची जादू आजही कायम आहे. महाभारत बनवण्याचा अनेकांनी प्रयत्न केला, पण त्याच्यासारखी कथा कोणीही दाखवू शकले नाही.
या मालिकेतील प्रत्येक पात्राला चाहत्यांनी भरभरून प्रेम दिले होते. या मालिकेत असे अनेक कलाकार आहेत जे आजही इंडस्ट्रीत सक्रिय आहेत, पण काही स्टार्स असे आहेत जे आता अज्ञात झाले आहेत. यामध्ये कुंतीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री नाजनीनच्या नावाचाही समावेश आहे. नक्की ही अभिनेत्री अचानक कुठे गायब झाली ? तिच्या चित्रपट करीअरला का समोर ब्रेक मिळाला नाही? जाणून घेऊया या लेखाच्या माध्यमातून..
महाभारतातील कुंतीचे पात्र साकारणारी नाजनीन 36 वर्षांपासून बेपत्ता ?
महाभारतात पांडवांच्या आई कुंतीची भूमिका साकारणारी नाजनीन लोकांची आवडती अभिनेत्री बनली होती. अभिनेत्रीचा जन्म 23 फेब्रुवारी 1958 रोजी कोलकाता येथे झाला. तिचे वडील एका छापखान्याचे मालक होते. तिला लहानपणापासूनच सिनेमाची आवड होती. नाजनीनला एअर होस्टेस व्हायचं होतं, तरीही तिच्या आईला वाटत होतं की आपल्या मुलीसाठी फ्लाइटमध्ये काम करणं सुरक्षित नाही, म्हणून जेव्हा नाजनीनला चित्रपटांची ऑफर आली तेव्हा तिने त्यातच आपलं करिअर घडवलं. मात्र, आज ती लाइमलाइटपासून दूर आहे. तिच्या वैयक्तिक आयुष्यात काय चालले आहे आणि तो कुठे आहे याचे भानही कुणाला नसते.
महाभारतातील कुंती म्हणजेच नाजनीन यांची ७०-८० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्रींमध्ये गणना होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिग्दर्शक सत्येन बोस यांना नाजनीन बॉलिवूडच्या जया बच्चनसारखी दिसत होती. यामुळेच तिने अनेक चित्रपटांमध्ये जया बच्चन यांच्या बहिणीची भूमिका साकारून वाहवा मिळवली. नाजनीनला साईड रोल करायला कधीच आवडत नसे. यामुळे ती खूप दुःखी झाली आणि तिने ऑफर्स नाकारायला सुरुवात केली होती.
महाभारतातील कुंतीने बिकिनी परिधान करून खळबळ उडवून दिली होती
महाभारतातील कुंतीने काही बी-ग्रेड चित्रपटांमध्येही काम केले. 1976 मध्ये तिने ‘चलते चलते’ चित्रपटात बिकिनी परिधान करून खळबळ उडवून दिली होती. नायक विशाल आनंदमुळे हा चित्रपट सुपरहिट झाला असला तरी बोल्ड व्यक्तिरेखेमुळे नाजनीनच्या प्रतिमेवर मोठा परिणाम झाला. वास्तविक, तिला टाइपकास्ट भूमिका टाळायची होती, म्हणूनच तिने चित्रपटात बिकिनी घालण्याचा निर्णय घेतला होता.
नाजनीनची कारकीर्द खूपच लहान होती. पंडित और पठाण (1977), हैवान (1977), कोरा कागज (1974) यासह एकूण 22 चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. महाभारतात तिची चर्चा झाली होती पण आता ती बहिणीच्या भूमिकेतून आईच्या भूमिकेकडे वळली होती, पण ती आपल्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये कधीच हिट अभिनेत्री होऊ शकली नाही. आज नाजनीन फिल्म इंडस्ट्रीपासून दूर एकाकी आयुष्य जगत आहे.
हे ही वाचा:
- IND vs IRE Live Streaming: विश्वचषकातील टीम इंडियाचा पहिला सामना आज, पहा कधी? कुठे किती वाजता सुरु होणार पहिला सामना…!
- BIG UPSET: विश्वचषकात अमेरिकेने पाकिस्तान संघाचा केला पराभव, लज्जास्पद कामगिरीमुळे भडकला बाबर आझम, केले मोठे वक्तवय..