IPL 2023: यावेळी हे भारतीय दिग्गज खेळाडू खेळणार शेवटची IPL, यादीत अनेक मोठ्या दिग्गज खेळाडूंचा समावेश
IPL 2023: यावेळी हे भारतीय दिग्गज खेळाडू खेळणार शेवटची IPL, यादीत अनेक मोठ्या दिग्गज खेळाडूंचा समावेश

यंदा चा 2023 चा आयपीएल हंगाम हा 31 मार्च पासून सुरू होणार आहे. या आयपीएल मध्ये अनेक बदल केलेले आहेत. तसेच अनेक खेळाडू नवीन सुद्धा आले आहेत. तर मित्रांनो आज आम्ही या लेखात अश्या दिग्गज खेळाडू बद्दल सांगणार आहे ज्यांची ही आयपीएल शेवटी ठरणार आहे जाणून घेऊया कोण आहेत ते खेळाडू.
महेंद्रसिंग धोनी –
भारतीय क्रिकेट संघातील सर्वात अनुभवी खेळाडू महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने आतापर्यंत 4 वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे. परंतु या वर्षी महेंद्रसिंह धोनी शेवटची आयपीएल खेळू शकतो अशी बातमी आहे.
दिनेश कार्तिक- दिनेश कार्तिक हा भारताचा महान यष्टिरक्षक फलंदाज म्हणून ओळखला जातो आणि त्याचे वयही खूप जास्त आहे. अशा परिस्थितीत दिनेश कार्तिकचा हा आयपीएल हंगाम शेवटचा ठरू शकतो.
पियुष चावला आणि अमित मिश्रा- अमित मिश्रा आणि पियुष चावला हे दोघेही अनुभवी फलंदाज आहेत, ज्यांचे वयही खूप जास्त आहे. हे खेळाडू अनेक सामनेही खेळत नाहीत. अशा परिस्थितीत या वेळी दोघेही शेवटची आयपीएल खेळणार आहेत.
इशांत शर्मा- इशांत शर्माला भारतीय संघात खेळण्याची संधी मिळत नाही आणि आता त्याची आयपीएल कारकीर्द संपण्याची वेळ आली आहे. गेल्या आयपीएल ऑक्शन मध्ये ईशांत शर्मा विकला गेला न्हवता. परंतु यंदा च्या वर्षी दिल्ली संघाने त्याला विकत घेतले.