क्रिकेटसाठी वयाच्या 11व्या वर्षी सोडले घर! मुंबईत घेतले प्रशिक्षण; आधी विश्वचषक स्पर्धेत आणि आता आयपीएल मध्ये धमाल

0

आयपीएल 2024 मध्ये युवा खेळाडू आपली प्रतिभा दाखवत छाप सोडत आहेत. कोलकत्ता नाईट रायडर्स संघाकडून आयपीएलमध्ये प्रथम फलंदाजी करताना 18 वर्षाचा अंगकृष रघुवंशी याने 27 चेंडूत 54 धावांची शानदार खेळ केली. आरसीबी विरुद्धच्या सामन्यामध्ये रघुवंशी याला इम्पॅक्ट क्लिअर म्हणून सामील केले होते. पण त्याला फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात अंगकृष रघुवंशी ने अनरिख़ नॉर्खियेच्या पहिल्याच पूल चेंडूवर चौकार मारत डावाची सुरुवात केली आणि आपल्या शानदार खेळीने सर्वांचे मन जिंकले.

 

अंगकृष रघुवंशी
अंगकृष रघुवंशी

अंगकृष रघुवंशी हा सर्वात कमी वयाचा खेळाडू असताना अर्धशतक ठोकले. सध्याचे त्याचे वय 18 वर्ष 303 दिवसाचे आहे. यापूर्वी हा विक्रम श्रीवस्त गोस्वामी यांच्या नावावर होता त्याने वयाच्या 19व्या वर्षी 2008 मध्ये आयपीएल मध्ये पदार्पण केले होते. पदार्पणाच्या पहिल्या सामन्यात त्याने 52 धावा केल्या होत्या.

 

अंगकृष रघुवंशी
अंगकृष रघुवंशी

रघुवंशी हा आयपीएल मध्ये अर्धशतक करणारा सातवा सर्वात युवा खेळाडू ठरला. 2008 मध्ये शुभमन गिल हा 18 वर्ष 237 दिवसांचा असताना कोलकाता नाईट रायडर्सचा सर्वात दुसरा युवा खेळाडू ठरला. 2008 मध्ये जेम्स फोक्स याने अवघ्या 20 चेंडूमध्ये अर्धशतक ठोकले होते. आयपीएलच्या पहिल्या डावांमध्ये झालेले हे सर्वात दुसरे अर्धशतक ठरले.

रघुवंशी ने 2022 मध्ये झालेल्या 19 वर्षीय विश्वचषक स्पर्धेमध्ये दमदार कामगिरी करून प्रकाशझोतात आला होता. 19 वर्षाखालील झालेल्या विश्वचषक स्पर्धेतील सहा सामन्यात 278 धावा केल्या होत्या. भारताकडून सर्वाधिक धावा काढणारा खेळाडू ठरला होता. दिल्लीचा रहिवासी असलेला रघुवंशीने मुंबई कडून स्थानिक क्रिकेट खेळत होता.

रघुवंशीच्या बाबतीमध्ये एक वेगळी कहाणी आहे. 2015 मध्ये तो दहा वर्षाचा असताना त्याच्या आई-वडिलांनी मोठा निर्णय घेतला. त्यांनी रघुवंशी याला अभिषेक नायरच्या देखरेखी खाली ट्रेनिंग देण्यास इच्छुक होते. त्यासाठी त्याला मुंबईला पाठवले. अकरा वर्षाच्या रघुवंशी ने मुंबईत येऊन नायरच्या देखील खाली प्रशिक्षण घेऊ लागला. मुंबईत अभिषेक नायर सोबत अविष्कार साळवी या दोघांकडून त्याने क्रिकेटचे धडे गिरवले.  अवघ्या सोळा वर्षाच्या या खेळाडू ने 19 वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेमध्ये धडाकेबाज कामगिरी केली.

रघुवंशीचा संपूर्ण परिवार हा वेगवेगळ्या खेळाशी जोडला गेला आहे. त्याचे वडील अवनिश भारत हे टेनिस क्रिकेट खेळायचे तर आई मल्लिका ही बास्केटबॉल खेळत होती. 19 वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेतील दमदार कामगिरीच्या जोरावर रघुवंशी याला मुंबईच्या संघामध्ये संधी मिळाली. मागील वर्षी त्याने टी-20 क्रिकेट मध्ये पदार्पण केले. लिस्ट ए च्या 5 सामन्यांमध्ये 26.60 च्या सरासरीने 133 धावा केल्या. सी के नायडू ट्रॉफी मध्ये नऊ सामन्यात 765 धावा काढून त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

विश्वचषक स्पर्धेतील दमदार कामगिरीमुळे केकेआरने त्याला वीस लाख रुपये च्या बेस प्राईस मध्ये खरेदी केले. आयपीएल मध्ये आतापर्यंत आठ टी-20 सामन्यांमध्ये त्याने 116 च्या स्ट्राईकरेटने 138 धावा केले आहेत. त्याची कामगिरी अशीच सुरू राहिली तर भारतीय संघामध्ये त्याचे पदार्पण होऊ शकते. केकेआर ने देखील 2008 पासून अनेक युवा खेळाडूंना आपली प्रतिभा दाखवण्यासाठी संधी दिली होती. त्यापैकीच एक खेळाडू म्हणजे रघुवंशी आहे. केकेआर चे प्रशिक्षक चंद्रकांत पंडित व मेंटोर  गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली तो त्याच्या बॅटिंगमध्ये अधिक सुधारणा करू शकतो.

==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.