दिल्ली कॅपिटल्स संघात झाली ‘या’ आफ्रिकन खेळाडूची एन्ट्री; हॅरी ब्रूकच्या जागी संघात खेळणार…!

0
13
दिल्ली कॅपिटल्स संघात झाली 'या' आफ्रिकन खेळाडूची एन्ट्री; हॅरी ब्रूकच्या जागी संघात खेळणार...!
ad

ताज्या बातम्या आणि अपडेट्स Whattsapp वर मिळवण्यासाठी जॉईन करा: Whatsapp Group

=======

आयपीएल 2024 च्या दरम्यान दिल्ली कॅपिटल्स संघाला एक गुड न्यूज मिळाली आहे. दिल्लीने या हंगामामध्ये काही विशेष छाप सोडली नाही. या फ्रेंचाईजीने आतापर्यंत खेळलेल्या 5 पैकी एकाच सामन्यात विजय मिळवता आला आहे. लीग सुरू होण्यापूर्वी काही महत्त्वपूर्ण खेळाडूंनी माघार घेतल्यामुळे या संघाला मोठा झटका बसला आहे. इंग्लंडचा स्टार फलंदाज हॅरी ब्रूक याने आयपीएलमधून आपले नाव माघार घेतले होती.

आयपीएल 2023 च्या लिलावामध्ये दिल्ली कॅपिटल्सने सनरायझर्स हैदराबाद कडून हॅरी ब्रुक याला 13.25 कोटी रुपयांमध्ये विकत घेतले होते. मात्र या खेळाडूने एक ही सामना न खेळता वैयक्तिक कारणामुळे आयपीएलमधून माघार घेतली होती. आता फ्रेंचाईजीने त्याच्या जागी नव्या खेळाडूची घोषणा केली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या स्टार युवा वेगवान गोलंदाजाला संधी देण्यात आली आहे. दिल्ली कॅपिटल्सने ही माहिती आपल्या ट्विटर अकाउंट वर दिली आहे.

दिल्ली कॅपिटल्स संघात झाली 'या' आफ्रिकन खेळाडूची एन्ट्री; हॅरी ब्रूकच्या जागी संघात खेळणार...!

दिल्ली कॅपिटल्सला त्यांच्या शेवटच्या मुंबई इंडियन्स विरुद्ध च्या सामन्यात दारून पराभवाला सामोरे जावे लागले होते. दरम्यान दिल्लीच्या संघामध्ये आता नव्या आफ्रिकन गोलंदाजाची एन्ट्री झाली आहे. लिजाद विलियम्स या वेगवान गोलंदाजाला दिल्ली कॅपिटल्सने आपल्या संघात स्थान दिले आहे. दिल्ली कॅपिटल्सने लिजाद याला 50 लाख रुपयांच्या बेस प्राईस मध्ये खरेदी करत आपल्या संघात सामील करून घेतले आहे.

या गोलंदाजाच्या आगमनामुळे दिल्लीची गोलंदाजी अधिक मजबूत झाली आहे. लीजाद विलियम्स याने 83 टी 20 सामन्यात 19.76 च्या सरासरीने 106 विकेट घेतले आहेत. त्याने एप्रिल 2022 मध्ये दक्षिण आफ्रिकन खेळताना क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने आतापर्यंत दोन कसोटी चार वनडे आणि 11 t20 सामने खेळले आहेत. लिजाद विल्यम्स 2023 मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेमध्ये दक्षिण आफ्रिका संघाचा सदस्य होता. त्याला केवळ बांगलादेश विरुद्धच्या सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली. दक्षिण आफ्रिकेतील t20 लीग मध्ये जोबर्ग सुपर किंग्स संघाकडून खेळताना 15 विकेट घेतले होते. सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाच्या यादीत तो चौथ्या स्थानावर राहिला.

दिल्ली कॅपिटल्स गुणतालिकेत सर्वात खाली दहाव्या क्रमांकावर आहे. आयपीएल 2024च्या विसाव्या सामन्यात मुंबईने शानदार पुनरागमन करत वानखेडे स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स संघाला पराभूत करत पहिला विजय मिळवला. यासह मुंबई इंडियन्स आता गुणतालिकेत आठव्या स्थानावर पोचली आहे.

दिल्ली कॅपिटल्स संघात झाली 'या' आफ्रिकन खेळाडूची एन्ट्री; हॅरी ब्रूकच्या जागी संघात खेळणार...!

हॅरी ब्रूक याने आयपीएलमध्ये न खेळण्याचे कारण काही दिवसांपूर्वी स्पष्ट केले आहे. ब्रूकच्या आजीचे निधन झाल्याने आयपीएल मधून माघार घेतल्याचे त्यांनी सांगितले. तो म्हणाला की,

माझ्या आजीचे काही दिवसांपूर्वी निधन झाल्याने मला माझ्या कुटुंबासोबत राहायचे होते. त्यामुळे मी आयपीएलमधून माघारी घेतली आहे. ती माझ्यासाठी एका पर्वतासमान होती. माझं बालपण तिच्याच घरी गेल आहे. माझ्या जीवनाच्या जडणघडणीमध्ये तिचे फार मोठे योगदान आहे. जीवनाविषयीचा माझा दृष्टिकोन आणि क्रिकेट वरील माझे प्रेम या दोन्ही गोष्टींना तिने आकार दिला होता.

ब्रुक आयपीएल 2023 मध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळत होता. मागील वर्षी त्याने केकेआर संघाविरुद्ध दमदार शतक ठोकले होते. त्यानंतर मात्र त्याला फारशी चमकदार कामगिरी करता आले नाही. त्याची बॅट शांतच राहिली. त्यामुळे सनरायझर्स हैदराबाद संघाने त्याला आयपीएल ऑक्शनच्या वेळेस रिलीज करून टाकले. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्स संघाने त्याला चार कोटी रुपयांमध्ये खरेदी करून आपल्या संघात दाखल करू घेतले.


====

आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

 

IPL 2024: मुंबई इंडियन्सने अचानक केला संघात बदल, या दिग्गज खेळाडूला बाहेर काढून या इंग्लंड च्या खेळाडूला दिली संधी.

आयपीएलमधील पहिले षटक निर्धाव टाकणारा वेगवान गोलंदाज ‘कामरान खान’ आहे तरी कुठे? सध्या करतोय अशी कामे…!