अभी मजा आयेगा ना भिडू.. आयपीएल 2023 साठी समालोचन करणाऱ्यांची यादी जाहीर, हिंदीमध्ये हे 15 दिग्गज करणार कोमेंट्री..
अभी मजा आयेगा ना भिडू.. आयपीएल 2023 साठी समालोचन करणाऱ्यांची यादी जाहीर, हिंदीमध्ये हे 15 दिग्गज करणार कोमेंट्री..
आयपीएल 2023 हंगाम 31 मार्च रोजी सुरू होणार आहे. पहिल्या सामन्यात गतविजेता गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील लढत पाहायला मिळेल. उभय संघांतील हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. तत्पूर्वी यावर्षी आयपीएलमध्ये चाहत्यांचा रोमांच वाढवण्यासाठी समालोचकांची यादीत जाहीर झाली आहे.
यावर्षी आयपीएलमध्ये समालोचन (IPL Commentator) करणाऱ्यांची संख्या नेहमीपेक्षा जास्त दिसत आहे. यावर्षी आयपीएल जिओ सिनेमावर पाहायाला मिळणार असून एकूण 12 भाषांमध्ये मसालोचन ऐकण्याची सुविधाही उपलब्ध असणार आहे. याच कारणास्तव 12 भाषांमध्ये समालोचक करण्यासाठी माजी खेळाडू आणि जाणकारांची नियुक्त केली गेली आहे.

आयपीएल 2023 मध्ये समालोचन करणाऱ्यांची यादी –
इंग्लिश समालोचक – ख्रिस गेल, एबी डिविलियर्स, ऑयन मॉर्गन, ब्रेट ली, ग्रीम स्वान, ग्रॅमी स्मिथ, स्कॉट स्टायरीस, संजना गणेशन, सुप्रिया सिंग, सुहेल चाडोक, सुहेल चाडोक.
हिंदी समालोचक – ओवैस शाह, झहीर खान, सुरेश रैना, अनिल कुंबळे, रॉबीन उथप्पा, पार्थिव पटेल, आरपी सिंग, प्रज्ञान ओझा, आकाश चोप्रा, निखील चोप्रा, सबा करीम, अनंत त्यागी, रिधिमा पाठक, सुरभी वैध, ग्लेन साल्दान्हा.
मराठी समालोचक – केदार जाधव, धवल कुलकर्णी, किरण मोरे, सिद्धेश लाड, प्रसन्ना संत, प्रसन्न संत, चैतन्य संत, कुणाल दाते, विकत पाटील, पूर्वी भावे.
गुजराती समालोचक – मनप्रीत जुनेजा, व्रिजेश हिर्जी, काहेश पटेल, राकेश पटेल, भार्गव भट्ट, निशांत मेहता, श्रेयून मेहता, करण मेहता, असीम.
भोजपुरी समालोचक – मोहम्मद सैफ, शिवम सिंग, सत्या प्रकाश, गुलाम हुसैन, सौरभ वर्मा, कुणाल आदित्य सिंग, विशाल आदित्य सिंग, स्नेह उपाध्याय, डिम्पल सिंग.
बंगाली समालोचक – झुलन गोस्वामी, लक्ष्मण रतन शुक्ला, सौराशीश, सौरशिष लाहिरू, सुभोमय दास, श्रीवत्स गोस्वामी, सनजीब मुखर्जी, सारादींदू मुखर्जी, आनिनद्या सेनगुप्ता, साहेब.
ओरिया समालोचक – देबाशिष मोहंती, बसंता मोहंती,रश्मी रंजन परिदा, बिप्लब समंत्राय, गौरव पांडा, लोरिया मोहंती, शोबना मिश्रा
मल्याळम समालोचक – सचिन बेबी, रोहन प्रेम, सोनी चरुवथूर, व्हीए जगदीश, मोहम्मद रफिक, अजू जॉन थॉमस, रेणू जोसेफ, सितारा, बिनॉय.
कन्नड समालोचक – वेंकटेश प्रसाद, एस एरविंद, अमित वर्मा, वेदा कृष्णमूर्ती, एच शरथ, सुजय शास्त्री, दीपक चौगले, राघवेंद्र राज, सुमंत भट, रीना डिसूझा, हिता चंद्रसेकर, अंकिता अमर.
तमिळ समालोचक – अभिनव मुकुंद, आर श्रीधर, विद्युत शिवरामकृष्णन, बाबा अपराजित, बाबा इंद्रजीथ, अनिरुद्ध श्रीकांत, केबी अरुण कार्तिक, सुधीर श्रीनिवासन, भागवती प्रसाद, संजय पॉल, श्रीनिवास राधाकृष्णन, समीना अन्वर, गायत्री सुरेश.
तेलगू समालोचक – हनुमा विहारी, व्यंकटपथी राजू, अक्षर रेड्डी, डीबी रवी तेजा, संदीप बावनका, कल्याण हेमंत, ज्योती रमणा, प्रत्युषा ज्ञानेश्वरी.
पंजाबी समालोचक – सरनदीप सिंग, राहुल शर्मा, व्हीआरव्ही सिंग, रितिंदर सिंग सोढी, सुनील तनेजा, अतुल वासन, गुरजीत सिंग, पलक शर्मा.
वरील सर्व दिग्गज वेगवेगळ्या भाषेमध्ये समालोचन करणार असून बीसीसीआयने त्याच्या नावाची अधिकृत घोषणा केली आहे. आयपीएल २०२३ चा सुरवातीचा सामना 31 मार्चला चेन्नई सुपरकिंग आणि गुजरात टायटन्स यांच्यात गुजरातच्या अहमदाबाद येथील नरेंद्र मोडी स्टेडियम येथे खेळवला जाणार आहे.
त्याआधी जबरदस्त अशी ओपनिंग सेरेमनी सुद्धा आयोजित केली गेली आहे ज्यात बॉलीवूडचे स्टार अभिनेते आणि अभिनेत्री आपल्या नृत्याने प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत.