Cricket Newsक्रीडावर्ल्डकप 2023

World Cup Records: विश्वचषक स्पर्धेत 3 वेळा झालाय पाकिस्तानचा संघ अपसेट; वाचा कोणत्या संघानी केलाय पाकिस्तानचा पराभव

World Cup Records:  आयसीसी विश्वचषक 2023 मध्ये सोमवारी झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानने पाकिस्तानचा दणदणीत आठ विकेट राखून पराभव केला. विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानच्या संघाला आत्तापर्यंत तीन वेळा अपसेट व्हावे लागले आहे. तीन नवख्या संघाने पाकिस्तानचा पराभव केला होता. नवख्या संघाकडून झालेला हा पराभव पाकिस्तानच्या संघाला चांगला जिव्हारी लागणार आहे.

IND vs PAK: असे झाल्यास विश्वचषकात क्रिकेट प्रेमींना पुन्हा पाहायला मिळू शकतो भारत-पाकिस्तानचा हाय वोल्टेज सामना

1999 साली इंग्लंड मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत बांगलादेशसारख्या नवख्या संघाने नॉर्थम्पटन च्या मैदानावर पाकिस्तानचा दणदणीत 62 धावांनी पराभव केला होता. पाकिस्तानच्या या पराभवामुळे क्रिकेट जगतात एकच खळबळ माजली होते. पाकिस्तान वर विजयी मिळवत बांगलादेशचा संघ रातोरात स्टार झाला. बांगलादेशने पाकिस्तानला अपसेट केले तरी पाकिस्तानच्या संघाने या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. मात्र ऑस्ट्रेलियाकडून त्यांचा पराभव झाला होता.

2007 चा विश्वचषक वेस्टइंडीज मध्ये खेळवण्यात आला होता. या स्पर्धेत आयर्लंड सारख्या नवख्या टीमने इंजमामच्या पाकिस्तान संघाचा पराभव केला होता. या पराभवानंतर पाकिस्तानचा संघ साखळी सामन्यानंतर स्पर्धेबाहेर बाहेर पडला होता. नेदरलँड ने पाकिस्तानचा तीन गडी राखून पराभव करत स्पर्धेत सर्वात मोठा उलटफर करून दाखवला. या स्पर्धेत बांगलादेशच्या संघाने भारतीय संघाला देखील अपसेट केले होते.

IND vs BAN: भारत विजयाचा चौकार मारणार की बांगलादेश करणार उलटफेर? पुण्याच्या मैदानावर आज रंगणार भिडंत

आयसीसी विश्वचषक 2023 मध्ये काल चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी इतिहास घडवला. या सामन्यात अफगाणिस्तानने पाकिस्तानचा दणदणीत आठ विकेट राखून पराभव केला. या विजयासह अफगाणिस्तानने गुणतालिकेत चार गुणांसह सहाव्या स्थानावर झेप घेतली आहे. पाकिस्तानने 283 धावांचे विशाल आव्हान अफगाणिस्तान समोर ठेवले होते. अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी हे आव्हान 2 गड्यांच्या मोबदल्यात सहज पार केले.

अफगाणिस्तानने यापूर्वी इंग्लंड सारख्या बलाढ्य संघाचा पराभव या स्पर्धेत केला होता. त्यानंतर काल चेन्नईच्या मैदानावर पाकिस्तानचा पराभव करून त्यांनी दुसरा चमत्कार घडवून आणला. अफगाणिस्तानने पहिल्यांदाच वनडे क्रिकेटमध्ये पाकिस्तानवर विजय मिळवला. पाकिस्तानच्या या पराभवामुळे त्यांचे पुढचे सेमी फायनल मध्ये पोहोचण्याचे रस्ते अवघड झालेत.

World Cup Records: विश्वचषक स्पर्धेत 3 वेळा झालाय पाकिस्तानचा संघ अपसेट; वाचा कोणत्या संघानी केलाय पाकिस्तानचा पराभव

पाकिस्तानने विश्वचषकातील 5 पैकी 2 सामन्यात विजय मिळवला आहे. या विजयासह पाकिस्तानचे गुण चार झाले आहेत. या पराभवामुळे सेमी फायनलमध्ये पोहोचण्याचे पाकिस्तानचे सारेच गणित बिघडून गेले आहे. सेमी फायनल मध्ये पोहोचण्यासाठी पाकिस्तानच्या संघाला आता बरीच प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागणार आहे. अन्यथा रिकाम्या हातानेच पाकिस्तानच्या संघाला मायदेशी परतावे लागेल. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी पाकिस्तानच्या संघाला विजयाचा प्रबळ दावेदार मानला जात होता. मात्र प्रत्यक्षात त्यांची कामगिरी नावाला लौकिक अशी झाली नाही.


हेही वाचा:

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button