लखनऊ सुपर जाइंट्स संघाला मोठा झटका: बंदुकीतील गोळीच्या वेगाप्रमाणे गोलंदाजी करणारा खेळाडू पडला संपूर्ण स्पर्धेबाहेर

शिवम मावी

इंडियन प्रीमियर लीग 2024 मधील के एल राहुलच्या नेतृत्वाखाली उतरलेल्या लखनऊ सुपर जाइंट्स संघाने आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. तीन पैकी दोन सामन्यात विजय मिळवत चार गुणांसह ते गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहेत. आयपीएल सुरू असताना इंग्लंडच्या काही खेळाडूंनी या संघाचे मध्यंतरी साथ सोडून मायदेशी परतले. आता पुन्हा एक मोठा झटका या संघाला बसला आहे. वेगवान गोलंदाज शिवम मावी हा दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

शिवम मावी
शिवम मावि

बंदुकीच्या गोळी प्रमाणे वेगवान गोलंदाजी करणारा मावे या हंगामामध्ये एकही सामना खेळणार नाही. लखनऊ ने या युवा गोलंदाजाला मिनी ऑक्शन मध्ये 6.4 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले होते. शिवम मावीच्या बाबतीत अपडेट देताना फ्रेंचाईजीने सांगितले की,शिवम मावी

शिवम मावी
शिवम मावी

 

हा दुर्दैवीरीत्या आयपीएल 2024 मधून बाहेर पडला आहे. डिसेंबर महिन्यात झालेल्या ऑक्शन मध्ये या वेगवान गोलंदाजाला आम्ही खरेदी केले होते. हा हंगाम सुरू होण्यापूर्वी प्रिसिजन कॅम्प मध्ये तो सहभागी झाला होता. शिवम आमच्यासाठी महत्त्वपूर्ण खेळाडू होता. त्याच्या बाहेर पडण्याने आम्ही सर्वजण दुखी झालो आहोत. आशा करतो की तो लवकरच फिट होऊन पुढच्या हंगामासाठी तयार राहील”.

फ्रेंचाइजी इंस्टाग्राम वर शुभम मामीचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे व्हिडिओमध्ये मावी म्हणतोय की, “मी या हंगामाला खूपच मिस करेन. मी दुखापतीतून सावरून हा हंगाम खेळण्यासाठी मैदानात उतरणार होतो आणि चांगली कामगिरी करण्याच्या विचारात होतो. पण दुर्दैवाने मला पुन्हा दुखापत झाली आणि ही स्पर्धा मध्यंतरी सोडावी लागली. ”

मावीच्या आयपीएल करिअर बाबतीत बोलायचं झाले तर त्याने आतापर्यंत 32 सामन्यात 31.4 च्या सरासरीने 30 विकेट घेतले आहेत. दोन धावा देऊन चार विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. आयपीएलमध्ये त्याचा इकॉनॉमिक रन रेट 8.71 असा आहे. यापूर्वी मावी गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघाचे प्रतिनिधित्व देखील केले आहे. मावीने भारताकडून सहा टी-ट्वेंटी सामने खेळले असून 17.57 च्या सरासरीने सात विकेट घेतले आहे.

 

==

 

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.