या भारतीय खेळाडूंनी सर्वात जास्त वेळा जिंकला आहे मैन ऑफ द सीरीज चा खिताब, जाणून घ्या कोण आहेत हे खेळाडू.
क्रिकेट चे वेड साऱ्या जगात पसरले आहे. प्रत्येक घरोघरी क्रिकेट चे चाहते असतात हे काही सांगायची गरज नाही. प्रत्येक क्रिकेट खेळाडू चे स्वप्न असते की टेस्ट मॅचेस मध्ये आपल्याला सुद्धा खेळता यावे. परंतु टेस्ट मॅचेस मध्ये प्रत्येक खेळाडू चा परफॉर्मन्स चांगला राहीलच असे नाही.
बऱ्याच वेळा टेस्ट मॅचेस मध्ये चांगले खेळाडू सुद्धा कमी धावांवर बाद होतात आणि एखादा प्लेअर हळू हळू खेळून शतक सुद्धा मारू शकतो हे आहे टेस्ट मॅचेस चे खरे वैशिष्ट आहे. टेस्ट मॅचेस चा सामना हा संपूर्ण 5 दिवसाचा असतो. या 5 दिवसांमध्ये खेळाडू चे धैर्य आणि संयम याची परीक्षा घेतली जाते.

आपल्या देशाकडे एकापेक्षा एक अशे वरचढ खेळाडू आहेत. असे अनेक खेळाडू आहेत ज्यांचा टेस्ट मॅचेस मध्ये जोरदार परफॉर्मन्स आहे. तर मित्रांनो या लेखात आम्ही टेस्ट मॅचेस मध्ये सर्वात जास्त मैन ऑफ द सीरीज चा खिताब जिंकला आहे अश्या भारतीय खेळाडूंची नावे सांगणार आहोत.
रविचंद्रन अश्विन:-
भारतीय संघातील अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून रविचंद्रन अश्विन ला ओळखले जाते. तसे म्हंटले तर रविचंद्रन अश्विन हा भारताचा स्टार स्पिनर गोलंदाज आहे. आतापर्यंत रविचंद्रन अश्विन ने भारताकडून 86 टेस्ट मॅचेस खेळल्या आहेत. या 86 टेस्ट मॅचेस मध्ये रविचंद्रन अश्विन याने 9 वेळा मैन ऑफ द सीरीज चा खिताब आपल्या नावी केला आहे.
वीरेंद्र सेहवाग :-
भारतीय संघाचे माजी क्रिकेपटू फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने आतापर्यंत भारताकडून 104 टेस्ट मॅचेस खेळल्या आहेत या मॅचेस दरम्यान सेहवाग ला 5 वेळा मैन ऑफ द सीरीज चा किताब जिंकला आहे.
सचिन तेंडूलकर:-
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा भारताचा माजी फलंदाज , आता पर्यंत सचिन तेंडुलकर ने भारताकडून 200 टेस्ट मॅचेस खेळला आहे या मॅच दरम्यान सचिन ने 5 वेळा मैन ऑफ द सीरीज चा खिताब मिळवला आहे. सचिन तेंडूलकर चे टेस्ट मॅचेस मध्ये सर्वात जास्त धावा आणि सर्वात जास्त शतके सचिन तेंडुलकर च्या नावी आहे.