- Advertisement -

डोळ्यावर चेंडू लागल्यामुळे अतिशय वाईटरित्या संपली होती ‘या’ स्टार यष्टीरक्षकाची क्रिकेट कारकीर्द, अन्यथा आज असता महेंद्रसिंहधोनी पेक्षाही नंबर १ यष्टीरक्षक..

0 2

डोळ्यावर चेंडू लागल्यामुळे अतिशय वाईटरित्या संपली होती ह्या स्टार यष्टीरक्षकाची क्रिकेट कारकीर्द, अन्यथा आज असता अंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील नंबर १ यष्टीरक्षक..


क्रिकेटर जखमी होण्याच्या अनेक घटना आपण आजपर्यंत पहिल्या आहेत. कधी फिल्डिंग करतांना तर कधी झेल घेतांना खेळाडू नेहमीच जखमी होत असतात. अंतर काही काही खेळाडू हे एवढे दुर्वेदी असतात की, मैदानावरील छोट्याश्या जखमेमुळे कधी कधी त्यांचे संपूर्ण करिअर बरबाद होऊ शकते.

होय.. आसच काहीस झालं होत दक्षिण आफ्रिकेचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ‘मार्क बाउचर’ सोबत. यष्टीरक्षण करतांना एक चेंडू त्याच्या डोळ्यावर लागला आणि त्याची संपूर्ण कारकीर्दच खराब झाली.

नक्की कोण होता ‘मार्क बाउचर? आणि कसा झाला हा अपघात जाणून घेऊया सविस्तर..

दक्षिण आफ्रिकेसह जागतिक क्रिकेटमधील सर्वात यशस्वी यष्टीरक्षकांपैकी एक असलेल्या मार्क बाउचरचा जन्म ३ डिसेंबर १९७६ रोजी झाला होता. मार्क बाउचरने संपूर्ण कारकिर्दीत जबरदस्त विकेटकीपिंगचे प्रदर्शन केले.

boucher getty 630

मार्क बाउचरने वयाच्या 22 व्या वर्षी 1997 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आणि सुमारे 15 वर्षे ते दक्षिण आफ्रिकेच्या संघात सेवा देत राहिले.  त्याच्या कारकिर्दीचा विचार केला तर मार्क बाऊचरच्या कारकिर्दीचा दुर्दैवी अंत झाला आहे.

दुःखद घटनेने मार्क बाउचरची कारकीर्द संपवली

मार्क बाउचरला 2012 मध्ये एका अत्यंत दुर्देवी घटनेनंतर क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी लागली. जुलै 2012 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाकडून खेळताना मार्क बाउचरला विकेटकीपिंग करताना डोळ्याला दुखापत झाली होती. यानंतर मार्क बाउचर कधीच क्रिकेटच्या मैदानात उतरू शकला नाही.

विकेटकीपिंग करताना डोळ्याला बेल्स लागली, पुन्हा मैदानात प्रवेश करता आला नाही.

ही घटना आहे त्यावेळेसची दक्षिण आफ्रिकेचा संघ जुलै 2012 मध्ये इंग्लंड दौऱ्यावर गेली होती. यामध्ये दक्षिण आफ्रिका आणि सॉमरसेट यांच्यात सराव सामना खेळला जात होता. 10 जुलै रोजी झालेल्या या सामन्यात सॉमरसेटचा फलंदाज जरमल हुसैनला दक्षिण आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज इम्रान ताहिर गोलंदाजी करत होता.

यष्टीरक्षक

ताहीरने टाकलेला चेंडू विकेटला आदळल्याने  त्यावरील बेल्स  विकेटला लागून उभ्या असलेल्या यष्टीरक्षक मार्क बाउचरच्या डोळ्यावर लागली. हेल्मेटशिवाय विकेटकीपिंग करणाऱ्या मार्क बाउचरच्या डोळ्यातून रक्तस्त्राव सुरू झाला आणि त्याची दुखापत इतकी गंभीर होती की त्यानंतर तो पुन्हा मैदानात उतरू शकला नाही.

मार्क बाउचरचे नाव क्रिकेटमधील सर्वोत्तम आणि यशस्वी यष्टीरक्षकांमध्ये येते. सर्वाधिक स्टंपबाद  करण्याचा जागतिक विक्रम मार्क बाउचरच्या नावावर आहे. मार्क बाउचरने 147 कसोटी सामने खेळले ज्यात त्याने 532 झेल घेतले आणि 23 स्टंपिंग केले. आणि एकूण 555 शिकार केल्या. मार्क बाउचर हा यष्टिरक्षणाच्या बाबतीत भारताचा महान यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीपेक्षा खूप पुढे होता. धोनीने आपल्या कसोटी कारकिर्दीतील 90 कसोटींमध्ये 294 बळी घेतले आहेत.


हेही वाचा:

“वर्ल्डकप मध्ये ऑरेंज कॅप सुरु करा” के.एल. राहुल पुन्हा स्वस्तात बाद झाल्याने चाहते झाले प्रचंड नाराज, सोशल मिडीयावर उडवली जातेय खिल्ली..

आकाश चोप्रा ते हर्ष भोगले.. एका क्रिकेट सामन्यासाठी तब्बल एवढी फीस घेतात हे कोमेंटेटर, त्यांच्या कोमेंटरीचे आहेत लाखो दिवाने.

थरारक सामन्यात पाकिस्तानचा पराभव…झिम्बाब्वेविरुद्ध 130 धावा काढण्यातच पाकिस्तानच्या झाल्या पुंग्या टाईट,पहा स्कोरकार्ड..

विराट कोहलीच्या खेळीवर कर्णधार रोहित शर्मा भलताच खुश, सामना जिंकल्यानंतर केले हे मोठे विधान..

Leave A Reply

Your email address will not be published.