Viral Video:मॅथ्यू वेडने ठोकला रॉकेट सिक्स, पाहून विरोधी संघाचा कर्णधारही झाला हैराण, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

मॅथ्यू वेड:  अंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये  शनिवारी (23 डिसेंबर) बेलेरिव्ह ओव्हल, होबार्ट येथे झालेल्या बिग बॅश लीग 2023-24 (Big Bash League) सामन्यात होबार्ट हरिकेन्सने मेलबर्न रेनेगेड्सचा 6 गडी राखून पराभव केला. मेलबर्नच्या 183 धावांना प्रत्युत्तर देताना होबार्टने 1 षटक शिल्लक असताना 4 गडी गमावून विजय मिळवला.

होबार्टच्या विजयाचा नायक सलामीवीर आणि यष्टिरक्षक फलंदाज मॅथ्यू वेड (matthew wade)  होता, त्याने 50 चेंडूत 9 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 82 धावा केल्या. वेडने आपल्या डावात केवळ चौकारांद्वारे 54 धावा केल्या. वेडने आपल्या डावात उत्कृष्ट षटकार ठोकला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Viral Video:मॅथ्यू वेडने ठोकला रॉकेट सिक्स, पाहून विरोधी संघाचा कर्णधारही झाला हैराण, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

विल सदरलँडने टाकलेल्या डावातील सातव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर वेडने गाय कॉर्नरवर गगनचुंबी षटकार मारला. वेडचा हा शॉट इतका शानदार होता की चेंडू 8 सेकंद आकाशातच राहिला.

या सामन्यातील उत्कृष्ट कामगिरीसाठी ‘वेड’ला सामनावीर म्हणून निवडण्यात आले.

नाणेफेक हारल्यानंतर आणि प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर मेलबर्नने 5 गडी गमावून 183 धावा केल्या. प्रत्युत्तरात होबार्टने 19 षटकांत विजय मिळवला. वेडशिवाय मॅकअलिस्टर राइटने 36 चेंडूंत 5 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 63 धावांची खेळी केली.

वर्ल्ड कपनंतर भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेत वेडने ऑस्ट्रेलिया संघाची कमान सांभाळली होती. वेड हा आयपीएलमधील गुजरात टायटन्स संघाचा एक भाग आहे. (matthew-wade hit stunning six in big bash league’s match)

मॅथ्यू वेड (matthew wade) ने ठोकला जबरदस्त षटकार,  पहा व्हिडीओ..


हेही वाचा:

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दीपक चहरच्या जागी भारतीय संघात खेळणार ‘आकाश दीप’ कोण आहे? वडील आणि भावाचे निधन, आईने मेहनत करून बनवले क्रिकेटर..

कारकीर्द कितीही वादाची असली तरीही, ‘सनथ जयसूर्या’ खेळाडू जबराटचं होता…

IPL AUCTION 2024: आई शेतमजूर तर बाप बांधकाम मजूर.. आयपीएलच्या मिनी लिलावात बिहारच्या ‘या’ तरुणाची चर्चा; धोनीला मानतो आदर्श..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *