आता कमबॅक झालाच समजा! मयांक अगरवालचा रणजी ट्रॉफी स्पर्धेत धुमाकूळ; ठोकल्या ९३५ धावा

भारतीय संघाचा फलंदाज मयांक अगरवालने रणजी ट्रॉफी २०२२-२३ स्पर्धेत जोरदार कामगिरी केली आहे. या हंगामातील त्याने दुसरे द्विशतक झळकावले आहे. मात्र हे द्विशतक खूप खास आहे. कारण त्याने हे द्विशतक उपांत्य फेरीच्या सामन्यात झळकावले आहे. यासह तो या हंगामात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज देखील ठरला आहे.
कर्नाटक संघाचे नेतृत्व करणाऱ्या मयांक अगरवालने सौराष्ट्र विरुद्धच्या सामन्यात ४२९ चेंडूचा सामना करत २८ चौकार आणि ६ षटकारांचा मदतीने २४९ धावांची खेळी केली. यादरम्यान तो धावबाद होऊन माघारी परतला. कर्नाटक संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत, १३३ षटक अखेर ४०७ धावा केल्या.
कर्नाटक संघाकडून मयांक अगरवालसह श्रीनिवास समर्थने ६६ धावांची खेळी केली. तर इतर कुठलाही फलंदाज २० धावांपेक्षा मोठी खेळी करू शकला नाही. हेच कारण आहे की, कर्नाटक संघाला केवळ ४०० धावा करता आल्या. जर मयांक यादवला आणखी एका फलंदाजाची साथ मिळाली असती तर नक्कीच कर्नाटक संघाने आणखी मोठी धावसंख्या उभारली असती.

तर मयांक अगरवालने दिल्लीच्या ध्रुव शौरी आणि केरळच्या सचिन बेबीला मागे सोडत,या हंगामात सर्वाधिक धावा केल्या आहेत. मयांकने आतापर्यंत ९३५ धावा केल्या आहेत. तर ध्रुवने ८५९ आणि सचिन बेबीने ८३० धावा केल्या आहेत.
हे ही वाचा..
आर अश्विनचा नादच खुळा! ऑस्ट्रेलिया विरुध्द एक गडी बाद करताच झाली ‘या’ मोठ्या विक्रमाची नोंद