PBKS vs LSG: भारताला आणखीन एक मिळाला वेगाचा बादशहा, आयपीएल मध्ये सर्वाधिक वेगाने चेंडू टाकून रचला इतिहास..!

PBKS vs LSG: भारताला आणखीन एक मिळाला वेगाचा बादशहा, आयपीएल मध्ये सर्वाधिक वेगाने चेंडू टाकून रचला इतिहास..!

 PBKS vs LSG: आयपीएल 2024 मध्ये शनिवारी लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्स ( PBKS vs LSG) या दोन्ही संघात एक रोमांचक सामना झाला. या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स संघातील 21 वर्षाचा मयंक यादव (Mayank Yadav) हा विजयाचा खरा हिरो ठरला. पदार्पणाच्या सामन्यातच धारदार गोलंदाजी करून साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. त्याने 155.8 च्या वेगाने चेंडू टाकून IPL 2024 चा सर्वात वेगवान चेंडू टाकला. त्याच्या धमाकेदार कामगिरीच्या जोरावर त्याला सामनावीरचा किताब देऊन गौरवण्यात आले.

लखनऊ सुपर जायंट्सच्या (LSG)  या वेगवान गोलंदाजाने आयपीएल पदार्पणाच्या सामन्यात चार षटकात 27 धावा देत तीन विकेट घेतले. मयंक सर्वात अधिक वेगाने गोलंदाजी करत अचानक प्रकाश झोतात आला. आयपीएलच्या कारकिर्दीतील पहिलाच चेंडू त्याने 147.1kph या स्पीडने टाकला. यानंतर, त्याने 4 षटकांच्या स्पेलमध्ये 150 किमी प्रतितास पेक्षा अधिक वेगाने 9 चेंडू टाकले. आश्चर्यकारक बाब म्हणजे त्याचा सर्वात स्लो चेंडू ताशी 141 किमी होता. मयंक यादव यांचा जन्म 17 जून 2002 मध्ये दिल्ली येथे झाला होता. तो दिल्लीकडून स्थानिक क्रिकेट खेळतो. दिल्ली येथील सोनेट क्लब कडून त्याने क्रिकेटचे धडे घेतले आहेत. यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत, शिखर धवन व आशिष नेहरा देखील याच क्लबचे खेळाडू आहेत.

लखनऊ सुपर जायंट्सने मयंक यादव याला आयपीएल 2022 मध्ये आपल्या संघात सामील केले होते. 20 लाख रुपयाच्या बेस प्राईज मध्ये त्याला खरेदी करण्यात आले. 2023 मध्ये तो दुखापतीमुळे बाहेर पडला. यंदाच्या हंगामात त्याने आयपीएल मध्ये पदार्पण करून धमाकेदार कामगिरी करत साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.

PBKS vs LSG: भारताला आणखीन एक मिळाला वेगाचा बादशहा, आयपीएल मध्ये सर्वाधिक वेगाने चेंडू टाकून रचला इतिहास..!

PBKS vs LSG: मयंक यादव गाजवतोय आयपीएल 2024.

मयंक यादव हा दिल्लीच्या एका सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेला मुलगा आहे. लॉकडाऊनच्या काळात त्याच्या वडिलांचा व्यवसाय देखील बुडून गेला. त्यामुळे त्याच्याकडे क्रिकेट खेळण्यासाठी बूट देखील नव्हते. त्यावेळी त्याच्या मदतीला सोनेट क्रिकेट क्लब धावून आला. त्याच्यासाठी खास बूट बनवण्याची ऑर्डर दिली होती. आज तो भारतीय क्रिकेटमध्ये स्टार खेळाडू बनला.

मागील वर्षी झालेल्या 23 वर्षाखालील कर्नल सीके नायडू स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली. सहा सामन्यात त्याच्या नावे पंधरा विकेट घेतल्याची नोंद आहे. छत्तीसगड विरुद्धच्या एका सामन्यात त्याने पाच बळी देखील घेतले होते. या सोबतच फलंदाजीत त्याने 66 धावांचे योगदान दिले. मयंकने 17 लिस्ट ए आणि 10 टी-20 सामने खेळले आहेत. यात त्याने अनुक्रमे 5.35 च्या सरासरीने 34 आणि 6.44 च्या सरासरीने 12 विकेट घेतले आहेत.

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2023-24 मध्ये देखील मयंकने धमाकेदार कामगिरी केली. स्पर्धेतील चार सामन्यात मयंकने पाच विकेट घेतले. याबरोबरच विजय हजारे ट्रॉफी मध्ये देखील पाच सामन्यात सहा विकेट घेतले. 2023 देवधर ट्रॉफी मध्ये नॉर्थ झोन कडून खेळताना पाच सामन्यात 12 विकेट घेतल्याची नोंद आहे.


====

आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

 

IPL 2024: मुंबई इंडियन्सने अचानक केला संघात बदल, या दिग्गज खेळाडूला बाहेर काढून या इंग्लंड च्या खेळाडूला दिली संधी.

IPL 2024: यॉर्कर स्पेशालिस्ट ‘जसप्रीत बुमराह’ आयपीएलसाठी पूर्णपणे फिट; यंदाच्या आयपीएल मध्ये या तीन विक्रमावर असेल नजर…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *