Viral Video: सलग दोन वर्षी ट्रॉफी गमावल्यानंतर अश्रू रोखू शकली नाही दिल्लीची कर्णधार ‘मेग लॅनिंग’, भावनिक व्हिडीओ होतोय सोशल मिडीयावर तुफान व्हायरल..

Viral Video: सलग दोन वर्षी ट्रॉफी गमावल्यानंतर अश्रू रोखू शकली नाही दिल्लीची कर्णधार 'मेग लॅनिंग', भावनिक व्हिडीओ होतोय सोशल मिडीयावर तुफान व्हायरल..

WPL 2024 Final:   महिला प्रीमियर लीग 2024 चा अंतिम सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला. दिल्ली कॅपिटल्स संघ सलग दुसऱ्यांदा डब्ल्यूपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचला पण दुसऱ्यांदाही दिल्ली कॅपिटल्सला पराभवाचा सामना करावा लागला. पहिल्या सत्रात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा तर दुसऱ्या सत्रात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला. पराभवानंतर दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार मेग लॅनिंग संपूर्ण पणे निराश झाली आणि मैदानावरच रडू लागली. तिचा हा व्हिडीओ आता सोशल मिडीयावर व्हायरल होतोय.

सलग 2 वेळा अंतिम सामन्यात पराभव कर्णधार ‘मेग लॅनिंग’ च्या लागला जिव्हारी,अश्रू लपवणे अवघड झाले..

 

पहिल्या सत्रात आणि या हंगामातही दिल्ली कॅपिटल्स संघाची कामगिरी उत्कृष्ट होती, परंतु संघ पुन्हा एकदा पहिल्या WPL विजेतेपदाला मुकला. दिल्लीची कर्णधार मेग लॅनिंगने या मोसमात शानदार फलंदाजी केली. मेग लॅनिंग ही WPL 2024 मध्ये सर्वाधिक धावा करणारी दुसरी खेळाडू होती. पण फायनलमध्ये तिला तितकी चांगली कामगिरी करता आली नाही. पराभवानंतर मेग लॅनिंगचे मन दु:खी झाले. यानंतर ती खूप रडताना दिसली. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

मेग लॅनिंगचा हा व्हिडिओ पाहून चाहतेही भावूक झाले. आता दिल्लीच्या कर्णधाराच्या या व्हिडिओवर चाहतेही आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने कमेंट करत लिहिले की, मेग लॅनिंगला असे पाहून प्रत्येकजण भावूक होतो. आणखी एका युजरने लिहिले की, मेग ही गेमची अनुभवी खेळाडू आहे.

 WPL final: आरसीबीने 8 गडी राखून मिळवला विजय!

अंतिम सामना हा लो स्कोअरिंग सामना होता. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सचा संघ 18.3 षटकांत सर्वबाद 113 धावांवर आटोपला. शेफाली वर्माशिवाय दिल्लीचा अन्य कोणताही फलंदाज जास्त वेळ क्रीजवर टिकू शकला नाही. शेफालीने दिल्लीकडून सर्वाधिक 44 धावांची खेळी खेळली होती.

Viral Video: सलग दोन वर्षी ट्रॉफी गमावल्यानंतर अश्रू रोखू शकली नाही दिल्लीची कर्णधार 'मेग लॅनिंग', भावनिक व्हिडीओ होतोय सोशल मिडीयावर तुफान व्हायरल..

त्याचवेळी आरसीबीसाठीही विजय इतका सोपा नव्हता. शेवटच्या षटकात आरसीबीने विजय मिळवला. आरसीबीने 19.3 षटकात 2 गडी गमावून विजय मिळवला. एलिस पेरीने पुन्हा एकदा आरसीबीसाठी शानदार खेळी केली. पॅरीने अंतिम सामन्यात 35 धावांची नाबाद खेळी खेळली.


==

आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *