मुंबई इंडियन्सची कर्णधार ‘हरमनप्रीत कौर’ने रचला इतिहास, WPL मध्ये अशी कामगिरी करणारी ठरली पहिली फलंदाज..
महिला प्रीमियर लीग 2023 (WPL 2023) च्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने ऐतिहासिक विजय नोंदवला. मुंबईने गुजरात जायंट्सचा 143 धावांनी पराभव केला. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 207 धावा केल्या. मुंबईकडून कर्णधार हरमनप्रीत कौरने 65 धावा केल्या.
गुजरातविरुद्धच्या पहिल्या सामन्यात कर्णधार हरमनप्रीत कौरने आपल्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर इतिहास रचला. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या हरमनप्रीत कौरने अवघ्या 22 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले आणि डब्ल्यूपीएलमध्ये अर्धशतक झळकावणारी ती पहिली फलंदाज ठरली.

हरमनप्रीत कौरने 22 चेंडूंत 11 चौकारांसह अर्धशतक पूर्ण केले. 30 चेंडूत 65 धावांची धडाकेबाज खेळी करून हरमनप्रीत कौर बाद झाली. हरमनप्रीत कौरने तिच्या खेळीत एकूण 14 चौकार मारले. कर्णधार हरमनप्रीतने डावात उत्कृष्ठ फटके खेळून चर्चेत आली. मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करणाऱ्या हरमनप्रीतचा डाव स्नेह राणाने संपुष्टात आणला. दयालन हेमलताने झेल टिपण्यात कोणतीही चूक न करता हरमनप्रीतचा डाव संपवला.
हरमनप्रीत कौरने आक्रमक फलंदाजी केली. कौरने आपल्या खेळीत अनेक जबरदस्त चौकार मारले. यासह महिला प्रीमियर लीगच्या इतिहासातील पहिले अर्धशतक हरमनप्रीत कौरच्या नावावर नोंदवले गेले. हरमनप्रीत कौरने चाहत्यांना आपल्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात धडाकेबाज ब्रेंडन मॅक्युलमची आठवण करून दिली.
तत्पूर्वी, गुजरात जायंट्सची कर्णधार बेथ मुनीने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने महिला प्रीमियर लीगच्या पहिल्याच सामन्यात 200 धावांचा टप्पा पार केला. मुंबई इंडियन्सने 20 षटकांत 5 गडी गमावून 207 धावा केल्या.
मुंबई इंडियन्सकडून कर्णधार हरमनप्रीत कौरने सर्वाधिक ६५ धावांची खेळी खेळली. हरमनप्रीत कौरने 30 चेंडूत 65 धावांची धडाकेबाज खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 14 चौकार मारले. त्याचवेळी सलामीवीर हेली मॅथ्यूने 31 चेंडूत 47 धावांची शानदार खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 3 चौकार आणि 4 षटकार मारले.
रिषभ पंतच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट! या सामन्यातून करणार कमबॅक..