रोहित शर्मा: आयपीएल 2024 च्या मिनी लिलावाला अगदी काही दिवस बाकी असतांना मुंबई इंडियन ने एक मोठा निर्णय जाहीर केला आहे. आज ( शुक्रवारी) मुंबई इंडियन्सने आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरून हार्दिक पांड्याला संघाचे नेतृत्व देण्याची घोषणा केली. आणि त्यानंतर सर्वच जण आयपीएलच्या इतिहासातील सर्वांत यशस्वी असलेला कर्णधार रोहित शर्माच्या पर्वाचा अध्याय संपल्याचं बोलत आहेत.
आता रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचा कर्णधार असणार नाही. रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनवण्यात आले आहे.
नवीन कर्णधाराची घोषणा केल्यानंतर मुंबई इंडियन्सने मानले रोहित शर्माचे आभार, स्पेशल व्हिडीओ शेअर केला.
Cricket Records : या 10 भारतीय खेळाडूंनी केलेले ‘हे’ विक्रम कोणालाही मोडता येणे अशकय होऊन बसलंय..
#MumbaiIndians Appointed #HardikPandya As Skipper After His Return #MumbaiIndians #IPL2024 #Bumrah #Hitman #Captaincy #हार्दिकपंड्या #Ambani pic.twitter.com/RcgehpvvYf
— IPL lATEST NEWS (@newsipl23) December 15, 2023
त्याचबरोबर सोशल मीडियावर मुंबई इंडियन्सने रोहित शर्माचे आभार मानले आहेत. तसेच व्हिडिओ शेअर केला आहे, या व्हिडिओमध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून रोहित शर्माचे संस्मरणीय क्षण दाखवण्यात आले आहेत.
मुंबई इंडियन्सने रोहित शर्मासाठी पोस्टमध्ये लिहिले.
‘रोहित, तू 2013 मध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार झालास. तुम्ही आम्हाला विश्वास ठेवण्यास सांगितले. तू म्हणालास की जिंकलो किंवा हरलो तरी हसावंच लागेल. 10 वर्षे आणि 6 ट्रॉफी, आज आम्ही येथे आहोत. आमचा कायमचा कर्णधार… तुमचा वारसा निळ्या आणि सोनेरी रंगात लक्षात राहील. धन्यवाद कॅप्टन.
Ro,
In 2013 you took over as captain of MI. You asked us to 𝐁𝐞𝐥𝐢𝐞𝐯𝐞. In victories & defeats, you asked us to 𝘚𝘮𝘪𝘭𝘦. 10 years & 6 trophies later, here we are. Our 𝐟𝐨𝐫𝐞𝐯𝐞𝐫 𝐜𝐚𝐩𝐭𝐚𝐢𝐧, your legacy will be etched in Blue & Gold. Thank you, 𝐂𝐚𝐩𝐭𝐚𝐢𝐧 𝐑𝐎💙 pic.twitter.com/KDIPCkIVop— Mumbai Indians (@mipaltan) December 15, 2023
रोहित शर्मा आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार!
आयपीएल 2013 च्या हंगामात पहिल्यांदाच रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनला होता. टूर्नामेंटच्या मध्यंतरी रिकी पाँटिंगच्या जागी रोहित शर्माला कर्णधार बनवण्यात आलं होतं. त्याच वर्षी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने प्रथमच आयपीएलचे विजेतेपद पटकावले. तसेच या वर्षी मुंबई इंडियन्स चॅम्पियन्स लीगचा विजेता ठरला होता.
यानंतर रोहित शर्माने कर्णधार म्हणून मुंबई इंडियन्सला 4 वेळा चॅम्पियन बनवले. रोहित शर्माने आयपीएल 2013 ते आयपीएल 2023 पर्यंत मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद कायम ठेवले, पण आता मुंबई इंडियन्सला सहाव्यांदा चॅम्पियन बनवण्याची जबाबदारी हार्दिक पांड्यावर असेल.
हेही वाचा:
कारकीर्द कितीही वादाची असली तरीही, ‘सनथ जयसूर्या’ खेळाडू जबराटचं होता…