MI vs DC LIVE: मुंबईच्या रनरागिणी पुढे दिल्लीच्या फलंदाजांनी टाकल्या नांग्या, केवळ एवढ्या धावावर सर्वबाद होत दिल्लीच्या नावावर झाले हे 2 नकोसे विक्रम..
महिला प्रीमियर लीग सध्या जोरात सुरु आहे. लीगमध्ये दिल्ली आणि मुंबईमध्ये सामना रंगला आहे. दिल्ली कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निणर्य घेतला जो मुंबईच्या गोलंदाजांनी चुकीचा ठरवला.
मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी जबरदस्त गोलंदाजी करत दिल्लीच्या फलंदाजांपैकी एकालाही ख्रीजवर सेट होऊ दिले नाही. दिल्लीची कर्णधार मेग लेलिंग आणि जेमिना रोडग्रीज वगळता दिल्लीच्या एकाही खेळाडूला दुहेरी धावसंख्या सुद्धा करता आलेली नाही.
Mumbai Indians in this WPL 2023
Bowled out Gujarat Giants for 64 runs
Bowled out RCB for 155 runs
Bowled out Delhi Capitals for 105 runsTeams yet to play 20 overs against MI #TATAWPL #MIvsDC #MumbaiIndians pic.twitter.com/ktUacJIKxB
— Pandu Raj (@CricketPanduRaj) March 9, 2023
दिल्ली केपीटलचा संपूर्ण संघ 105 धावावर केवळ 18 षटके खेळून बाद झाला. दिल्लीकडून कर्णधार मेग लेगिंगने सर्वाधिक धावा केल्या. तिने 41 चेंडूत 43 धावांची खेळी केली.
मुंबई इंडियन्सकडून गोलंदाजी करतांना सायका इशक,इस वोंग आणि हेली मैथ्यूज ने प्रत्येकी तीन तीन खेळाडू बाद करत दिल्ली संघाची दुर्दशा केली.

मुंबईला जिंकण्यासाठी आता 20 षटकामध्ये 106 धावांची गरज आहे, हा सामना जिंकताच मुंबई इंडियन्स जवळपास प्लेओफ मध्ये क़्वलिफ़ाय झालेली असेल.
विराट कोहलीच्या खेळीवर कर्णधार रोहित शर्मा भलताच खुश, सामना जिंकल्यानंतर केले हे मोठे विधान..