ताज्या बातम्या आणि अपडेट्स Whattsapp वर मिळवण्यासाठी जॉईन करा: Whatsapp Group
=======
MI vs GT: आयपीएल 2024 च्या पाचव्या सामन्यात गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा सहा धावांनी पराभव केला. गेल्या बारा वर्षात मुंबई इंडियन्सने आयपीएल मधील आपला पहिला सामना गमावला आहे. या सामन्यात मुंबईचा पराभव झाला असला तरी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने आपल्या धारदार गोलंदाजीने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. त्याने या सामन्यात एक नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे अशी कामगिरी करणारा तो पहिला गोलंदाज बनला आहे.
MI vs GT: गुजरात विरुद्धच्या सामन्यात जसप्रीत बूमराहने केला नवा विक्रम..
गुजरात टायटन्स विरुद्ध धारदार गोलंदाजी करत जसप्रीत बुमराहने चार षटकात 3.50 च्या सरासरीने केवळ 14 धावा देत तीन महत्त्वपूर्ण फलंदाजांना बाद केले. जसप्रीतने ऋद्धिमान साहा, साई सुदर्शन आणि डेव्हिड मिलर सारख्या स्टार फलंदाजांना स्वस्तात माघारी धाडले. साहाला तर त्याने आपल्या सटीक यॉर्कर चेंडूने क्लीन बोल्ड केले. विकेट घेतल्यानंतर गोलंदाजी प्रशिक्षक लसिथ मलिंग यांनी टाळ्या वाजवून त्याचे अभिनंदन केले. या विकेटचा व्हिडिओ आयपीएलने देखील त्यांच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे.
मुंबई इंडियंससाठी या सामन्यात तो सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याची ही दमदार कामगिरी मुंबई इंडियन्स संघाला विजयमिळवून देऊ शकली नाही.
MI vs GT: मुंबई इंडियंसकडून सर्वाधिक विकेट घेणारा दुसरा गोलंदाज ठरला जसप्रीत बुमराह!
जसप्रीत बुमराहने शानदार कामगिरीच्या जोरावर मुंबई इंडियन्स कडून खेळताना 151 विकेट घेतले आहेत. तो मुंबई इंडियन्स संघाकडून सर्वाधिक विकेट घेणारा दुसरा गोलंदाज बनला आहे. लसिथ मलिंगा हा मुंबई इंडियन्स कडून सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. त्याने मुंबई इंडियन्स कडून खेळताना 195 विकेट घेतले होते. या यादीमध्ये फिरकीपटू हरभजन सिंग तिसऱ्या स्थानावर आहे त्याने 147 बळी घेतले होते.
आयपीएल स्पर्धेमध्ये मुंबई इंडियंसकडून सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज.
-
195 बळी – लसिथ मलिंगा
-
151 बळी – जसप्रीत बुमराह
-
147 बळी – हरभजन सिंह
-
79 बळी – कायरन पोलार्ड
-
71 बळी – मिशेल मॅक्लेनाघन
-
51 बळी – क्रुणाल पांड्या
====
आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.