“त्याची फलंदाजी पाहून मला वाटलं होत सामना जाईल” तुफानी खेळी खेळणाऱ्या न्यूझीलंडच्या ब्रेसवेलबद्दल रोहित शर्माने केले मोठे वक्तव्य..
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला विजयाने सुरुवात केली. या मालिकेतील पहिला सामना 18 जानेवारी रोजी दोन्ही संघांमध्ये खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने 8 गडी गमावून 350 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात किवी संघाला दिलेले लक्ष्य गाठता आले नाही. पण पाहुण्या संघाचा खेळाडू मायकेल ब्रेसवेलने धडाकेबाज शतक झळकावून सर्वांना प्रभावित केले. त्याचवेळी रोहितही त्याच्या खेळीमुळे खूप खूश होता आणि सामना संपल्यानंतर त्याचे कौतुक करताना दिसला.
रोहित शर्माने मायकेल ब्रेसवेलच्या फलंदाजीचे केले कौतुक..

सामना जिंकल्यानंतर रोहित शर्माने मॅचनंतरच्या सेरेमनीमध्ये सांगितले की, मी मायकेल ब्रेसवेलच्या खेळीमुळे खूप खूश आहे. भारतीय कर्णधार म्हणाला,
“प्रामाणिकपणे सांगायचे तर, मायकेल ब्रेसवेलची खेळी ज्या पद्धतीने चालली आणि त्याने ज्या पद्धतीने फलंदाजी केली, ते विलक्षण होते. आम्हाला माहित होते की तो आम्हाला कडवी झुंज देईल. आम्ही चांगली गोलंदाजी केली तर जोपर्यंत आम्ही विकेट घेत राहिलो तोपर्यंत आम्ही सामना आमच्या बाजूने ठेवण्यास यशस्वी राहुल, हे आम्हाला माहीत होते. आणि तसेच झाले. मी नाणेफेकीच्या वेळी म्हणालो की मला स्वतःला आव्हान दिलेले पाहायचे आहे, आणि या सामन्यात तशीच परिस्थिती होती.
View this post on Instagram
हिटमॅनने भारतीय युवा फलंदाज शुभमन गिल आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचे कौतुक केले. तो म्हणाला,
“गिल खरोखरच मैदानावर चांगल्या लयीत दिसत आहे. तो ज्या फॉर्ममध्ये होता त्याचा फायदा आम्हाला घ्यायचा होता आणि म्हणूनच आम्ही श्रीलंका मालिकेत त्याला पाठिंबा दिला. तो मुक्तपणे फलंदाजी करतो आणि ते पाहणे रोमांचक आहे. सिराज केवळ या खेळातच नाही तर रेड-बॉल, टी-२० फॉरमॅट आणि आता वनडेमध्येही चमकदार कामगिरी करत आहेज्याचा फायदा संघाला मिळतोय. तो चेंडूवर काय करतो हे पाहणे खरोखर चांगले आहे. त्याला जे करायचे आहे ते तो पूर्ण करत आहे आणि त्याच्या योजनांबद्दल तो अगदी स्पष्ट आहे.”
विशेष म्हणजे या सामन्यात शुभमन गिलने 149 चेंडूत 208 धावा केल्या, तर मोहम्मद सिराजने 10 षटकात 2 मेडन षटकात 4 विकेट घेतल्या. या दोघांच्या या शानदार कामगिरीमुळे भारतीय संघाने 12 धावांनी विजय मिळवला. त्याचवेळी मायकेल ब्रेसवेलने 78 चेंडूत 140 धावा ठोकल्या.
हेही वाचा:
पाकिस्तानच्या विजयानंतर भारतीय संघात होणार 3 मोठे बदल, असा असेल इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ…