क्रीडा

IND vs AUS: तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी वाढल्या भारतीय संघाच्या अडचणी, ऑस्ट्रोलियाचा हा घातक स्टार खेळाडू संघात दाखल.एकट्याने जिंकून दिलेत अनेक सामने..

IND vs AUS: तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी वाढल्या भारतीय संघाच्या अडचणी, ऑस्ट्रोलियाचा हा घातक स्टार खेळाडू संघात दाखल.. 


भारतातच ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारत चार सामन्यांची कसोटी क्रिकेट मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी करत भारतीय संघाने दोन्ही सामने जिंकले आणि मालिकेत दोन-शून्य (2-0) अशी आघाडी घेतली. त्याचवेळी दोन्ही सामने गमावल्यामुळे ऑस्ट्रेलियन संघाला मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान, ऑस्ट्रेलियन संघ पुढील दोन सामन्यांना सामोरे जाण्याच्या तयारीत आहे. या तिसऱ्या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघाचे अनेक खेळाडू जखमी झाले आहेत. याशिवाय संघाचा कर्णधार पॅट कमिन्स काही कारणांमुळे मायदेशी परतला आहे. तसेच मागील सामन्यात दुखापत झाल्याने वॉर्नर तिसऱ्या सामन्यात खेळणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mitchell Stark (@starkmitchel03)

जोश हेझलवूडही जखमी झाला आहे. त्याचप्रमाणे फिरकीपटू टॉड मर्फीलाही दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियन संघातील अनेक महत्त्वाचे खेळाडू जखमी झाले असून ते खेळू शकत नाहीत. आता संघासाठी एक आनंदाची बातमी आहे की संघाचा आघाडीचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क तिसऱ्या सामन्यासाठी संघात सामील होणार आहे.

अशा परिस्थितीत आपल्या वेगवान आणि स्विंगने भारतीय फलंदाजांना अडचणीत आणणाऱ्या ‘ मिचेल स्टार्क’चा तिसऱ्या सामन्यात समावेश केल्याने संघाला काही प्रमाणात बळ मिळू शकते. भारतासारख्या सपाट खेळपट्ट्यांवर तो शानदार रिव्हर्स स्विंग चेंडू टाकू शकतो आणि विकेट्स घेऊ शकतो म्हणून, त्याच्या येण्याकडे सध्या संघासाठी एकमेव सांत्वन म्हणून पाहिले जात आहे.

ऑस्ट्रोलिया

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना इंदूरमध्ये 1 मार्चपासून सुरू होत आहे. विशेष म्हणजे भारतीय संघाने हा सामनाही जिंकला तर मालिका जिंकून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मालिकेतील अंतिम फेरीत पोहोचेल, त्यामुळे चाहत्यांमध्ये या सामन्याबद्दलची अपेक्षा शिगेला पोहोचली आहे.


हेही वाचा:

सतत फ्लॉप होऊनही के.एल. राहुलला संघात जागा देऊन बीसीसीआय ‘या’ 3 खेळाडूंचे करिअर करतेय बर्बाद, एकजण तर आहे ताबडतोब फोर्ममध्ये..!

दुसऱ्या कसोटीत झालेल्या मोठ्या पराभवानंतर ऑस्ट्रोलीया संघाला आणखी एक मोठा धक्का, ‘या कारणामुळे कर्णधार पॅट कमिन्स परतला मायदेशी..!

‘या’ गोलंदाजाची धुलाई करत चेतेश्वर पुजाराने बनवलाय वर्ल्ड रेकॉर्ड! असा कारनामा करणारा ठरलाय पहिला फलंदाज

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button