जेव्हा मीना कुमारी चा बदला घेण्यासाठी डायरेक्टर ने एका सिन मध्ये रिटेक घेऊन मारल्या 31 कानाखाली
बॉलिवूड म्हटलं की पैसा आणि प्रसिद्धी ही आलीच. बॉलिवूड मधील अनेक कलाकार कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असतात. महागड्या गाड्या राहणीमान पैसा प्रसिद्धी आणि फॅशन. पूर्वीपासूनच बॉलिवूड मध्ये मोठी स्पर्धा आहे. आजकाल सर्वच ठिकाणी स्पर्धा आहेत. यामध्ये भांडण, कलह, बदला या गोष्टी तर राहणारच.

तर मित्रांनो आज आम्ही या लेखात तुम्हाला बॉलिवूड मधील एक किस्सा सांगणार आहे ज्यामध्ये मीना कुमारी बरोबर बदला घेण्यासाठी चक्क डायरेक्टर ने 31 कानाखाली मारून घेतल्या होत्या.
बॉलिवूड मधील ट्रेजडी क्वीन म्हणून ओळखली जाणारी मीना कुमारी हिने आपल्या अभिनयाच्या जोरावर संपूर्ण बॉलिवूड मध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. मीना कुमारी समोर अनेक मोठे मोठे ॲक्टर शांत बसायचे कारण मीना कुमारी ला अभिनय जबरदस्त येत होता.
मीना कुमारी यांच्या बाजूबंद या चित्रपटाच्या शूटिंग च्या दरम्यान नरगिस दत्त चे भाऊ अनवर हुसेन यांनी सांगितले की मीना कुमारी यांनी एका प्रसिद्ध आणि मोठ्या डायरेक्टर चा चित्रपट साईन केला होता. डायरेक्टर ला वाटले की आता मीना कुमारी आपल्या चित्रपटामध्ये हिरोईन आहे आणि आपल्याच चित्रपटात काम करते मग आपण तिच्या बरोबर काहीही केले तर चालेल.
हे घाण विचार मनात घेऊन डायरेक्टर ने मीना कुमारीच्या पायावर पाय ठेवला. परंतु मीना कुमारी घाबरली नाही तिने स्वताला सावरून लगेच आपला पाय बाजूला घेतला. आणि मीना कुमारी ने डायरेक्टर ला चांगलेच सुनावले. त्यामुळे डायरेक्टर चां इगो हर्ट झाला.
इगो हार्ट झाल्यामुळे डायरेक्टर ने आपल्या चित्रपटात काही बदल केले. या मधील एका सिन मध्ये हिरो मीना कुमारी ला थप्पड मारायचा होता. परंतु डायरेक्टर ने हा सिन 31 वेळा रिटेक घेऊन मीना कुमारी ला 31 कानाखाली मारल्या.
त्यावर तो अभिनेता सुद्धा काही बोलला नाही परंतु मीना कुमारी हा सीन पूर्ण करण्याच्या प्रयत्नात होती नंतर सिन पूर्ण झाल्यावर मीना कुमारी मेकअप रूम मध्ये जाऊन रडली