IPL 2024: केकेआरचे 25 कोटी पाण्यात; विकेट घेण्यासाठी तरसतोय हा वेगवान गोलंदाज..!

IPL 2024: केकेआरचे 25 कोटी पाण्यात; विकेट घेण्यासाठी तरसतोय हा वेगवान गोलंदाज..!

ताज्या बातम्या आणि अपडेट्स Whattsapp वर मिळवण्यासाठी जॉईन करा: Whatsapp Group

=======

IPL 2024:आयपीएल 2024  (IPL 2024)च्या मिनी ऑक्शन मध्ये कोलकत्ता नाईट रायडर्स संघाने ऑस्ट्रेलियाचा घातक गोलंदाज मिचेल स्टार्क याला 24.74 कोटी रुपये देऊन संघात घेतले. केकेआरने आपले गोलंदाजी आक्रमण जबरदस्त व्हावे यासाठी महागडी किंमत देऊन या वेगवान गोलंदाजांना आपल्या संघात स्थान दिले. मात्र हे केकेआरचे 25 कोटी रुपये पाण्यात गेल्याचे दिसून येत आहे. कारण दोन सामन्यांमध्ये या खेळाडूला एकही विकेट घेता आली नाही. विकेट घेण्यासाठी या खेळाडूला अक्षरशः तरसावे लागत आहेत.

IPL 2024: केकेआरचे 25 कोटी पाण्यात,मिचेल स्टार्क लावतोय चुना..

मिचेल स्टार्कने आयपीएलच्या (IPL 2024) पहिल्या सामन्यात 53 धावा दिल्या त्याला एकही विकेट घेता आले नाही फलंदाज त्याची जबरदस्त धुलाई करत होते. दोन्ही सामन्यात मिळून त्याने शंभर पेक्षा अधिक धावा खर्च केले आहेत. स्टार्क विना केकेआर चे गोलंदाजी आक्रमण अधिक चांगले वाटत आहे. विशेष म्हणजे स्टार्क ला एक ही बळी घेता आले नसले तरी केकेआर ने दोन्ही सामन्यात जबरदस्त विजय मिळवले आहेत.

IPL 2024:  केकेआरचे 25 कोटी पाण्यात; विकेट घेण्यासाठी तरसतोय हा वेगवान गोलंदाज..!

सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध च्या पहिल्या सामन्यात स्टार्क जवळपास विलन ठरला होता. त्याच्या एका षटकामध्ये चार षटकार ठोकण्यात आले होते. हर्षद राणा याने कसेबसे केकेआरला शेवटच्या षटकामध्ये केकेआर ला विजय मिळवून दिला. त्यामुळे स्टार्क वाचला गेला. अन्यथा पराभवाचे सारे खापर त्याच्या माथ्यावर फोडले गेले असते.

काल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध झालेल्या सामन्यात देखील त्याची कहाणी सेम होती. चार षटकांमध्ये जवळपास त्याने 47 धावा दिल्या. मात्र एकही विकेट घेता आले नाही. काल विराट कोहलीने लेग साइड ला त्याच्या एका चेंडूवर फ्लिक शॉर्ट मारत अप्रतिम षटकार ठोकला होता. विराट कोहलीच्या फलंदाजी पुढे स्टार्क हतबल झाल्याचे दिसून आला. स्टार्कची अशी कामगिरी त्याला महागात पडू शकते. पुढच्या सामन्यात श्रेयस अय्यर त्याला बेंचवर बसू शकतो.

IPL 2024: केकेआरचे 25 कोटी पाण्यात; विकेट घेण्यासाठी तरसतोय हा वेगवान गोलंदाज..!

आयपीएल 2024 मध्ये मिचेल स्टार्क हा सर्वात महागडा खेळाडू ठरला. आतापर्यंत कोणत्याच खेळाडूला इतकी मोठी रक्कम मिळाली नाही. केकेआर ने स्टार्टला संघात घेण्यासाठी कोट्यावधी रुपयांची बोली लावली. मात्र भारतीय खेळपट्ट्यांवर त्याची कामगिरी निराशा जनक राहिली आहे. येणाऱ्या सामन्यात त्याची कामगिरी अशीच राहिली तर केकेआरच्या संघाला मोठा फटका बसू शकतो.


====

आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

 

IPL 2024: मुंबई इंडियन्सने अचानक केला संघात बदल, या दिग्गज खेळाडूला बाहेर काढून या इंग्लंड च्या खेळाडूला दिली संधी.

IPL 2024: यॉर्कर स्पेशालिस्ट ‘जसप्रीत बुमराह’ आयपीएलसाठी पूर्णपणे फिट; यंदाच्या आयपीएल मध्ये या तीन विक्रमावर असेल नजर…