हातातून रक्त येत होती तरीही करत होता गोलंदाजी..मिचेल स्टार्कचं देशप्रेम पाहून भारावून गेले नेटकरी. सोशल मिडियावर व्हिडीओ तुफान व्हायरल..
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. मालिकेतील तिसरा कसोटी सामना इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. तिसर्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात भारतीय संघ 109 धावांत ऑलआऊट झाला असताना 197 धावांवर आटोपला. पण दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू गोलंदाज मिचेल स्टार्क दुखापतग्रस्त होऊनही गोलंदाजी करताना दिसत आहे.
जखमी झाल्यानंतरसुद्धा स्टार्कने केली गोलंदाजी..
खरे तर तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 197 धावांवर आटोपला आणि भारतीय संघ फलंदाजीला आला.मिचेल स्टार्कने गोलंदाजीला सुरुवात केली. मात्र यादरम्यान डाव्या हाताच्या बोटातून रक्त येत असल्याचे दिसले. त्याच्या पँटवर बोटातून बाहेर पडलेले रक्ताचे डाग दिसत होते. पण स्टार्क पट्टी बांधून गोलंदाजी करताना दिसला.

मिचेल स्टार्क दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये सहभागी होऊ शकला नाही. भारताविरुद्ध तिसरा कसोटी सामना खेळणार असल्याचे वक्तव्य स्टार्कने तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी केले होते. पण तो पूर्णपणे तंदुरुस्त नाही आणि पूर्णपणे तंदुरुस्त होणेही शक्य नाही. पूर्ण तंदुरुस्त होण्यासाठी अजून वेळ लागेल, पण मी सामना खेळण्यासाठी तयार आहे आणि इंदूर कसोटी सामना खेळणार असल्याचे तो म्हणाला होता.
मिचेल स्टार्कची आंतरराष्ट्रीय कारकीर्द..
मिचेल स्टार्कच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने 76 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये मिचेल स्टार्कने 3.29 च्या इकॉनॉमीसह 304 विकेट घेतल्या आहेत, परंतु त्याच वेळी, स्टार्कने भारताविरुद्ध 16 कसोटी सामने खेळले आहेत. या 16 कसोटी सामन्यांमध्ये त्याने 30 डावात 42 विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान स्टार्कची सर्वोत्तम कामगिरी म्हणजे ५३ धावांत चार विकेट्स घेणे.
तिसर्या टेस्ट मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये भारत 109 रन्सवर ऑलआऊट झाला, तर ऑस्ट्रेलिया टीम 197 रन्सवर ऑलआऊट झाली आणि भारतावर 88 रन्सची आघाडी घेतली. दुसऱ्या दिवशी भारताने दुसऱ्या डावात उपाहारापर्यंत बिनबाद 13 धावा केल्या.
हे ही वाचा..
रिषभ पंतच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट! या सामन्यातून करणार कमबॅक..