दिल्ली कॅपिटल्स: आयपीएल 2024 च्या दरम्यान ऋषभ पंतचा संघ दिल्ली कॅपिटलच्या संघाच्या अडचणीत भर पडली आहे. एकीकडे खराब कामगिरीमुळे हा संघ गुणतालिकेत हा संघ नवव्या क्रमांकावर आहे. तर दुसरीकडे संघातील खेळाडू दुखापतीमुळे बाहेर पडत आहेत तर काही जणांनी लिग मध्ये वैयक्तिक कारणामुळे माघार घेतली आहे. सहा सामन्यात या संघाला केवळ दोनच सामने जिंकता आले.तर आता या संघाचा दिग्गज खेळाडू दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेबाहेर पडला आहे.
दिल्ली कॅपिटल्सचा अष्टपैलू खेळाडू स्वतःच्या मायदेशी परतला आहे. या अष्टपैलू चे मायदेशी परत जाणे दिल्ली कॅपिटल्सला चांगलेच महागात पडू शकते. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्श आहे. दिल्ली कॅपिटल्सचा पुढचा सामना 17 एप्रिल रोजी गुजरात टायटन्स विरुद्ध होणार आहे. पण त्याच्या सेनेसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. प्ले ऑफ मध्ये जाण्यासाठी दिल्लीला हा सामना कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकावी लागणार आहे. पण तत्पूर्वी दिल्लीच्या संघाला ही वाईट बातमी आली आहे. अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्च हा ऑस्ट्रेलियाला परत गेला आहे.
मार्श याने यंदाच्या आयपीएल हंगामामध्ये केवळ चारच सामने खेळू शकला आहे. त्यानंतर दोन सामन्यांना त्याला दुखापतीमुळे मुकावे लागले. या दुखापतीतून तो सावरेल असे वाटत होते. मात्र त्याची दुखापत गंभीर असल्याने तो उपचारासाठी ऑस्ट्रेलियाला माघारी परतला आहे. ऑस्ट्रेलिया मध्ये जाऊन त्याने दुखापती वर योग्य तो उपचार घेतल्यानंतर तो कदाचित मायदेशी परतू शकतो. दुखापत गंभीर असल्यास तो संपूर्ण स्पर्धे बाहेर पडू शकतो.
या अष्टपैलू खेळाडूने दिल्ली कॅपिटल्स कडून खेळताना चार सामन्यात 160 च्या स्ट्राइक रेटने केवळ 61 धावा केल्या आहेत. चार सामन्यात त्याला एकही मोठी धावसंख्या खेळती खेळता आली नाही. धडाकेबाज फलंदाजी करण्यात माहीर असलेल्या या खेळाडूला छाप सोडता आली नाही. गोलंदाजीत देखील त्याला काही खास कामगिरी करता आली नाही. 4 सामन्यात त्याला केवळ एकच बळी मिळवता आला.
====
आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.