AUS vs PAK: आयसीसी विश्वचषक 2023 (World Cup 2023) मध्ये झालेल्या 18 व्या सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा (AUS vs PAK) 62 धावांनी पराभव केला. पाच वेळाचा चॅम्पियन असलेल्या या टीमचा यंदाच्या स्पर्धेतला हा त्यांचा दुसरा विजय आहे. सामन्याच्या सुरुवातीला पाकिस्तानी नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला फलंदाजीस पाचारण केले. ऑस्ट्रेलियाने 50 षटकात 9 बाद 366 इतक्या डोंगराएवढया धावा केल्या. प्रतिउत्तरात पाकिस्तानचा संघ 45.3 षटकात 305 धावांवर सर्वबाद झाला.
AUS vs PAK: मिचेल स्टार्कने मोडला वसीम आक्रमचा विक्रम..
या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क (mitchell starc) याने पाकिस्तानचा दिग्गज वेगवान गोलंदाज वसीम अक्रम (Vasim Akram) याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. स्टार्क याने एक विकेट घेत नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे. विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये तो टॉप 5 मध्ये पोहोचला आहे.
विश्व कप स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये वसीम अक्रम हा चौथ्या स्थानावर आहे. त्याने या स्पर्धेत एकूण 55 विकेट घेतले आहेत तर ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्क याने देखील एक विकेट घेत आक्रमच्या या विक्रमाशी बरोबर केली आहे. आता दोघांच्या नावावर 55 विकेटची नोंद आहे.
विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाच्या यादीमध्ये वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्राथ हा पहिल्या स्थानावर आहे. त्याने त्याच्या कार्यकर्दीत 71 विकेट घेतले आहेत तर दुसऱ्या स्थानावर असलेला श्रीलंकेचा फिरकीपटू मुथ्थया मुरलीधरन याने 68 विकेट घेतले आहेत.
सामन्या बाबतीत बोलायचे झाले तर, साडेतीनशे पेक्षा जास्त धावांचा डोंगर उभा करण्यात ऑस्ट्रेलियाच्या सलामीच्या फलंदाजाचे सर्वात मोठे योगदान आहे. डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श यांनी पहिल्या विकेटसाठी 259 धावांची भागीदारी रचली. यात डेव्हिड वॉर्नरला दोनदा जीवनदान मिळाले. याचा फायदा घ्या त्याने 162 धावा काढल्या.
368 इतके डोंगराएवढ्या धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या पाकिस्तानचा संघ केवळ 305 धावा करू शकला. सलामीचा फलंदाज अब्दुल्ला शफिक आणि इमाम उल हक यांनी चांगली सुरुवात करून दिली.
दोघांनीही अर्धशतके खेळी करत 127 चेंडूत 134 धावांचे भागीदारी रचली. इमामने 70 तर शफिकने 64 धावांचे योगदान दिले. कर्णधार बाबर आझमची बॅट शांतच राहिली. तो 18 धावा काढून बाद झाला तर मोहम्मद रिजवान 46, शकील 30, इफ्तिकार अहमद 26 धावा काढून माघारी परतले.
ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजी करताना ॲडम जॅम्पा याने चार तर स्टोयनीस पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले तर स्टार्क आणि जोश हेजलवूड यांना प्रत्येकी एक गडी बाद करता आला. विश्वचषक स्पर्धेतला पाकिस्तानचा हा सलग दुसरा पराभव आहे तर ऑस्ट्रेलियाचा हा सलग दुसरा विजय आहे.
हेही वाचा:
- विश्वचषकात पहिल्याच चेंडूवर बाद झाले आहेत हे 6 फलंदाज; एक आहे भारताचा माजी प्रशिक्षक..
- ऑस्ट्रेलिया-इंग्लंड नव्हे तर भारतच आहे वनडेमध्ये,’चेस मास्टर’; तब्बल 18 वेळा पार केलाय 300 पेक्षा जास्त धावांचा स्कोर
- .अफगाणिस्तानी तरुणी विद्यार्थ्यांना वाटते विश्वचषकाचे मोफत तिकिटे? कोण आहे ही तरुणी
- पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिल विषयी मिळाली मोठी अपडेट; वाचा काय आहे बातमी