Mitchell Starc IPL: कोलकत्ताचे 24.75 करोड रुपये पाण्यात जाणार? मिचेल स्टार्क ‘या’ 2 मोठ्या कारणामुळे होऊ शकतो आयपीएलमधून बाहेर..

Mitchell Starc IPL: कोलकत्ताचे 24.75 करोड रुपये पाण्यात जाणार? मिचेल स्टार्क 'या' 2 मोठ्या कारणामुळे होऊ शकतो आयपीएलमधून बाहेर..

Mitchell Starc IPL: आयपीएल 2024  (IPL 2024) च्या लिलावात शाहरुख खानची आयपीएल टीम कोलकाता नाईट रायडर्स (KKR)ने आयपीएल लिलावाचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढत 24.75 कोटी रुपयांची बोली लावून मिशेल स्टार्कचा (Mitchell Starc) आपल्या संघात समावेश केला आहे.मिचेल स्टार्कसाठी एवढी महागडी बोली लावल्याची चर्चा संपूर्ण क्रिकेट विश्वात होत आहे.

आयपीएलच्या इतिहासात कधीही कोणत्याही खेळाडूवर इतकी महागडी बोली लावली गेली नव्हती. दरम्यान, दुखापतीमुळे कोलकाता नाईट रायडर्ससाठी मिचेल स्टार्कवर (Mitchell Starc) एवढा मोठा सट्टा लावणे चुकीचे ठरू शकते का, अशी चर्चा चाहते करत आहेत. नक्की केकेआरने मिचेल स्टार्क वर खेळलेला डाव कसा फसू शकतो, यावर एक नजर टाकूया.

Mitchell Starc IPL: कोलकत्ताचे 24.75 करोड रुपये पाण्यात जाणार? मिचेल स्टार्क 'या' 2 मोठ्या कारणामुळे होऊ शकतो आयपीएलमधून बाहेर..

IND vs SA, 3rd ODI: कर्णधार केएल राहुल इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर… दक्षिण आफ्रिकेमध्ये अशी कामगिरी करणारा ठरू शकतो एकमेव भारतीय कर्णधार..

मिचेल  स्टार्कची (Mitchell Starc )दुखापत केकेआरचे टेन्शन बनू शकते

कोलकाता नाईट रायडर्सने 24.75 कोटी रुपयांची महागडी बोली लावून आयपीएल 2024 लिलावात ऑस्ट्रेलियाचा सर्वात प्रसिद्ध वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कचा आपल्या संघात समावेश केला आहे. यानंतर चर्चेला जोर आला आहे की, जर ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आयपीएल 2024 दरम्यान जखमी झाला आणि त्यामुळे तो आयपीएलमधून बाहेर पडला, तर अशा परिस्थितीत कोलकाता नाईट रायडर्स मिचेल स्टार्कवरील हा मोठा सट्टा अपयशी ठरू शकतो.

मिचेल स्टार्कची  (Mitchell Starc)  पत्नी आहे 5 महिन्याची गरोदर.

स्टार्कच्या आयपीएल खेळण्याबाबत शंका येण्याचे दुसरे एक मोठे कारण म्हणजे, स्टार्कची पत्नी ‘हेली’ (Alyssa Healy) 5 महिन्याची गरोदर आहे. आयपीएल सुरु होईल तोपर्यंत ती प्रसूतीच्या अगदी जवळ आलेली असेल. अश्या स्थितीमध्ये स्टार्क सुरवातीचे काही सामने खेळून एका महिन्यानंतर पत्नीच्या डीलेवरीसाठी पत्नीकडे जाऊ शकतो, असे बोलले जात आहे.

Mitchell Starc IPL: कोलकत्ताचे 24.75 करोड रुपये पाण्यात जाणार? मिचेल स्टार्क 'या' 2 मोठ्या कारणामुळे होऊ शकतो आयपीएलमधून बाहेर..

Mitchell Starc IPL: T20 मध्ये मिचेल स्टार्कची कामगिरी

मिचेल स्टार्क, जो ऑस्ट्रेलियाचा सर्वात प्रमुख वेगवान गोलंदाज मानला जातो, तो सध्या पाकिस्तानविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेचा भाग आहे. केवळ आयपीएल 2024च नाही तर तो आता आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू बनला आहे. आंतरराष्ट्रीय टी-२० मधील त्याची कामगिरी पाहिली तर त्याची कामगिरी चांगली झाली आहे. त्याने 58 सामन्यात गोलंदाजी करताना 73 बळी घेतले आहेत.

 

त्याच IPL मध्ये त्याने 27 सामन्यांच्या 26 डावात गोलंदाजी करताना 34 विकेट्स घेतल्या आहेत. IPL 2024 मध्ये तो 9 वर्षांनंतर जगातील सर्वात मोठ्या लीगमध्ये परतणार आहे. याआधी तो शेवटचा आयपीएल 2015 मध्ये खेळला होता. त्यावेळी तो रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा भाग होता. आता तो 2 वेळा आयपीएल विजेता कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना दिसणार आहे.

Mitchell Starc IPL: कोलकत्ताचे 24.75 करोड रुपये पाण्यात जाणार? मिचेल स्टार्क 'या' 2 मोठ्या कारणामुळे होऊ शकतो आयपीएलमधून बाहेर..

आता कोलकत्ताने त्याच्यावर खेळलेला हा सटटा किती यशस्वी होतो ,हे पाहण्यासाठी आपल्याला आयपीएल 2024 सुरु होण्याची वाट पहावी लागेल. दुसरीकडे कोलकत्ताचे चाहते मात्र स्टार्कने त्याच्या नावाप्रमाणे आणि पैश्याप्रमाणे कामगिरी करावी, अशीच अपेक्षा बाळगून असतील.


हेही वाचा:

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दीपक चहरच्या जागी भारतीय संघात खेळणार ‘आकाश दीप’ कोण आहे? वडील आणि भावाचे निधन, आईने मेहनत करून बनवले क्रिकेटर..

कारकीर्द कितीही वादाची असली तरीही, ‘सनथ जयसूर्या’ खेळाडू जबराटचं होता…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *