‘भारतासोबत अंतिम सामना हे म्हणजे..’ विश्वचषक फायनल आधी हे काय बोलून गेला मिचेल स्टार्क, सोशल मिडीयावर व्हिडीओ तुफान व्हायरल..

मिचेल स्टार्क: विश्वचषक 2023 आता अंतिम सामन्यावर येऊन ठेपला आहे. उद्या रविवारी भारत आणि ऑस्ट्रोलीया (IND vs AUS) यांच्यात अंतिम सामना होणार आहे. या सामन्याआधी आधी जग्भारतील क्रिकेट दिग्गज खेळाडू विश्वचषक कोण जिंकेल? याबाबत आपापले अंदाज वर्तवत आहे.

ऑस्ट्रोलीयाचा दिग्गज गोलंदाज मिचेल स्टार्क यानेही अंतिम सामन्याआधी भारतीय संघाला थेट इशाराच दिला आहे. नक्की काय म्हणाला स्टार्क जाणून घेऊया आगदी सविस्तर..

IND vs AUS, World Cup Final: अंतिम सामन्याआधी मिचेल स्टार्कने केले मोठे वक्तव्य, टीम इंडियाला थेट इशाराच दिला.

'भारतासोबत अंतिम सामना हे म्हणजे..' विश्वचषक फायनल आधी हे काय बोलून गेला मिचेल स्टार्क, सोशल मिडीयावर व्हिडीओ तुफान व्हायरल..

वर्ल्ड चॅम्पियन बनण्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया १९ नोव्हेंबरला आमनेसामने येणार आहेत. भारताने न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव करून अंतिम फेरी गाठली, तर ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा 3 गडी राखून पराभव करून अहमदाबादचे तिकीट निश्चित केले.

रविवारी क्रिकेट जगतातील दोन मोठे संघ जगातील सर्वात मोठ्या स्टेडियममध्ये आमनेसामने येणार आहेत. अशा स्थितीत अहमदाबादच्या खेळपट्टीबाबत चर्चा कशी होणार नाही? ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने अहमदाबादच्या खेळपट्टीबाबत महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे.

यंदाच्या वनडे विश्वचषकात भारतीय संघाने आतापर्यंत 10 पैकी 10 सामने जिंकले आहेत. गुरुवारी ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून आठव्यांदा वनडे विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली. सामन्यानंतर स्टार्क म्हणाला, “आम्हाला सर्वोत्तम संघाचा सामना करायचा आहे. आतापर्यंत भारत या स्पर्धेतील सर्वोत्तम संघ ठरला आहे. आता अंतिम फेरीत आम्ही दोघे आमनेसामने येणार आहोत. हा विश्वचषक आहे आणि त्यासाठी आम्ही क्रिकेट खेळतो.

'भारतासोबत अंतिम सामना हे म्हणजे..' विश्वचषक फायनल आधी हे काय बोलून गेला मिचेल स्टार्क, सोशल मिडीयावर व्हिडीओ तुफान व्हायरल..

 

स्टार्क पुढे बोलतांना म्हणाला की,

“आम्ही निश्चितपणे अशा संघाविरुद्ध अंतिम सामना खेळणार आहोत जो कोणत्याही आव्हानाचा सामना करू शकतो. ते आतापर्यंत नाबाद राहिले आहेत. मात्र आम्हीही यावेळी पूर्ण तयारीशी असू. भारतीय संघाने आम्हाला कमी समजण्याची चूक करू नये.

साखळी टप्प्यातील पहिला सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला होता, पण तो सामना एकतर्फी होता. चेन्नई येथे झालेल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला १९९ धावांत गुंडाळले होते. यानंतर हा सामना 6 विकेटने जिंकला होता.

स्टार्क पुढे म्हणाला,

“टूर्नामेंटच्या पहिल्या सामन्यात आमचा सामना भारताशी झाला होता. आता शेवटचा सामनाही त्याच्यासोबत खेळायचा आहे. या सामन्यात आम्ही आमची ताकत दाखवून देऊ. आणि भारतीय संघाला पराभूत करून ट्रॉफी पुन्हा एकदा आमच्या देशात नेऊ..

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला फिरकीला सामोरे जाण्यात खूप अडचण आली. अहमदाबादच्या खेळपट्टीबाबत स्टार्कला विचारण्यात आले. तो म्हणाला, “आम्ही उद्या अहमदाबादला पोहोचल्यावर खेळपट्टीबद्दल कळेल. त्यामुळे हा सामना नव्या खेळपट्टीवर खेळवला जाणार की जुन्या खेळपट्टीवर हे स्पष्ट होईल.”

2003 च्या एकदिवसीय विश्वचषक फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा 125 धावांनी पराभव केला होता. त्यावेळी स्टार्क 13 वर्षांचा होता. तो म्हणाला, “मला त्या सामन्याबद्दल एवढेच माहीत आहे की ऑस्ट्रेलियाने तो सामना जिंकला. याशिवाय त्या सामन्यात काय झाले हे मला माहीत नाही.”


हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *