मिचेल स्टार्क: आयपीएल 2024 (IPL 2024) साठी मिनी लिलाव काल (19 डिसेंबर) रोजी दुबईमध्ये पार पडला. या लिलावात ऑस्ट्रोलियाचे दोन दिग्गज खेळाडू सर्वांत महागडे ठरले. या लिलावात मिचेल स्टार्क तब्बल 24.75 कोटी रु तर कमिन्स20.5 कोटी रुपयांची विक्रमी बोली मिळवली आहे. यानंतर आता ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कची पहिला प्रतिक्रिया समोर आली आहे.
लिलाव झाल्यानंतर नक्की काय म्हणाला स्टार्क जाणून घेऊया अगदी सविस्तर..
ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने मंगळवारी सांगितले की, आयपीएल (IPL 2024) लिलावात 24.75 कोटी रुपयांची बोली लागेल असे स्वप्नातही वाटले नव्हते. एवढ्या मोठ्या किमतीमुळे तो काहीसा दडपणाखाली असल्याची कबुली दिली. कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) या 33 वर्षीय खेळाडूचा त्यांच्या संघात समावेश केला तेव्हा तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला.
नक्की काय म्हणाला मिचेल स्टार्क?
स्टार्क म्हणाला,
‘नक्कीच हे धक्कादायक होते. याचा विचार मी स्वप्नातही करू शकत नव्हतो. यामुळे काही दडपण येईल यात शंका नाही. पण मला आशा आहे की आयपीएलमधील माझ्या मागील अनुभवाचा मला फायदा होईल.” डावखुरा गोलंदाज म्हणाला, ”मी याआधीही काही चढ-उतार पाहिले आहेत. हे अनुभवासोबत येते. मी शक्य तितके यशस्वी होण्याचा आणि प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करतो.” स्टार्कसाठी केकेआर आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात लिलावात शर्यत होती.
पुढे बोलतांना मिचेल स्टार्क म्हणाला,
“मला हे पाहून खूप नम्र वाटते. माझ्या योजनांमध्ये काही गोष्टी वगळता फारसा बदल झालेला नाही. आशा आहे की, मी माझ्या अनुभवाचे यशात रूपांतर करू शकेन.”
स्टार्कचा ऑस्ट्रेलियन सहकारी पॅट कमिन्सला सनरायझर्स हैदराबादने 20.50 कोटी रुपयांना खरेदी केले, जे त्याच्या किंमतीपेक्षा 4.25 कोटी रुपये कमी आहे. स्टार्कने सांगितले की, तो आणि कमिन्स दोघांनाही त्यांच्या ऑस्ट्रेलियन सहकाऱ्यांसाठी पार्टी द्यावी लागेल.
कमिन्सवर स्टार्क काय म्हणाला?
, ‘पॅट (कमिन्स) सनरायझर्समध्ये गेला आहे, पण तो यापूर्वी केकेआरमध्ये राहिला आहे. मला आशा आहे की मी ते भरून काढू शकेन. आम्हाला आमच्या कसोटी टीमच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये पार्टी देण्यास सांगितले आहे. बॉक्सिंग डे टेस्ट (26 डिसेंबरपासून पाकिस्तानविरुद्ध) होण्यापूर्वी आम्हाला काहीतरी करायचे आहे,” स्टार्क हसत म्हणाला. “माझी पत्नी अॅलिसा (हिली) ही (ऑस्ट्रेलिया) महिला (क्रिकेट) संघासोबत भारतात आहे. त्यामुळे, या लिलावाचे अपडेट माझ्यापेक्षा लवकर तिला मिळत होते. आणि तिनेच मला कॉल करून सांगितले.
2015 नंतर मिचेल स्टार्क पहिल्यांदा उतरणार आयपीएलच्या मैदानात
2015 नंतर स्टार्कची ही पहिली आयपीएल असेल. त्यानंतर तो रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा भाग होता. तो म्हणाला की, आयपीएलच्या माध्यमातून तो आगामी टी-२० विश्वचषकाची तयारी मजबूत करेल. तो म्हणाला, “टी-20 विश्वचषक पाहता, जगातील सर्वोत्तम टी-20 लीगमध्ये काही स्पर्धात्मक सामने खेळण्याची माझ्यासाठी चांगली संधी असेल.
आता एवढी मोठी बोली लावून संघात सामील करून घेतलेले हे खेळाडू आपापल्या संघासाठी कशी कामगिरी करतात, हे पाहणे रंजक ठरणार आहे. आयपीएल 2024 मार्च महिन्यामध्ये सुरु होऊ शकते, अद्याप त्याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाहीये.
हेही वाचा:
कारकीर्द कितीही वादाची असली तरीही, ‘सनथ जयसूर्या’ खेळाडू जबराटचं होता…