यशस्वी जैस्वाल: IPL 2024 मध्ये राजस्थान रॉयल्सच्या टीमने विजयाचा धडाका लावला आहे. राजस्थान रॉयल्सने सोमवारी पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सला हरवलं. संजू सॅमसनच्या टीमने पॉइंट्स टेबलमधील आपलं स्थान अधिक बळकट केलं आहे. राजस्थानला या विजयासह आणखी एक आनंदाची बातमी मिळाली आहे.
ही बातमी म्हणजे ओपनर यशस्वी जैस्वालच शतक. यंदाच्या सीजनमध्ये यशस्वीच्या बॅटमधून धावा आटल्या होत्या. मागच्या सात सामन्यात त्याच्या बॅटमधून एकही अर्धशतक निघालं नव्हतं. यशस्वीचा सर्वश्रेष्ठ स्कोर 39 होता. पण सवाई मानसिंह स्टेडियममध्ये जैस्वाल एका वेगळ्याच रंगात दिसला. या खेळाडूने तुफानी बॅटिंग करत सेंच्युरी पूर्ण केली.
यशस्वी जैस्वालने जयपूरच्या मैदानात फोर-सिक्सचा पाऊस पाडला. या खेळाडूने एकूण 7 सिक्स मारले. 59 चेंडूत त्याने शतक झळकावलं. आयपीएल करिअरमधील त्याचं हे दुसरं शतक आहे. या शतकासह यशस्वी जैस्वालने एक मोठा रेकॉर्डही रचला आहे. तो सर्वात कमी वयात आयपीएलमध्ये दोन शतकं झळकवणारा खेळाडू बनला आहे. यशस्वी जैस्वालच आता 22 वर्षांचा आहे.
शतकानंतर यशस्वी जैस्वाल काय म्हणाला?
यशस्वी जैस्वालने शतक झळकवल्यानंतर मागच्या 7 सामन्यातील अपयशाला यशामध्ये कसं बदललं त्या बद्दल सांगितलं. जैस्वाल म्हणाला की, “मला फक्त चेंडू दिसत होता. मागच्या सात सामन्यातील अपयशाची गोष्ट माझ्या डोक्यात नव्हती” “मी क्रिकेटिंग शॉट्स खेळण्यावर लक्ष दिलं. टीममधील सिनियर खेळाडूंनी साथ दिली” कोच कुमार संगकारा आणि कॅप्टन संजू सॅमसन यांनी सातत्याने संधी दिल्याबद्दल त्याने आभार मानले. नेट्समध्ये केलेली कठोर मेहनत उपयोगात आली, असं जैस्वाल म्हणाला. यशस्वीचा खराब फॉर्म हीच राजस्थानसाठी चिंतेची बाब होती. मात्र आता त्यानेही फोर्ममध्ये परतल्याचे संकेत दिल्यामुळे राजस्थान चा संघ आणखी मजबूत बनला आहे.
====
आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.