टी-20 विश्वचषक 2024 स्पर्धेत तब्बल 9 वर्षानंतर कम बॅक करणार ‘हा’ भारतीय खेळाडू?,निवड समिती आहे लक्ष देऊन….

0
1
==== आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved. IPL 2024: मुंबई इंडियन्सने अचानक केला संघात बदल, या दिग्गज खेळाडूला बाहेर काढून या इंग्लंड च्या खेळाडूला दिली संधी. IPL 2024: यॉर्कर स्पेशालिस्ट ‘जसप्रीत बुमराह’ आयपीएलसाठी पूर्णपणे फिट; यंदाच्या आयपीएल मध्ये या तीन विक्रमावर असेल नजर…

टी-20 विश्वचषक 2024:  भारतात सध्या आयपीएल 2014 स्पर्धा सुरू आहेत. आयपीएल नंतर लगेच एक जून रोजी आयसीसी टी-20 विश्वचषक 2014 स्पर्धेला सुरुवात होणार आहे. आयपीएल लीगच्या शेवटच्या टप्प्यात भारतीय क्रिकेट संघाची निवड होणार आहे. म्हणजे मे च्या शेवटच्या आठवड्यात भारतीय संघ घोषित करण्याची शक्यता आहे. टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघ अगोदरच ठरलेला आहे. 2023 वनडे विश्वचषकातील बरेच खेळाडू या विश्वचषक स्पर्धेत खेळणार आहेत. एक दोन जागा सोडल्या तर 2023 वनडे विश्वचषकातील सेम टीम यात खेळताना दिसून येऊ शकते.

टी-20 विश्वचषक 2024 स्पर्धेत तब्बल 9 वर्षानंतर कम बॅक करणार हा भारतीय गोलंदाज?,निवड समिती आहे लक्ष देऊन....

2023 वनडे विश्वचषक स्पर्धा गाजवणारा भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी टी-20 विश्वचषक स्पर्धेला मुकु शकतो. दुखापतीमुळे तो या स्पर्धेतून बाहेर पडण्याची दाट शक्यता आहे. मोहम्मद शमीच्या जागी एका 35 वर्षीय खेळाडूची निवड होऊ शकते. हा तोच खेळाडू आहे ज्याने 2015 मध्ये ऑस्ट्रेलिया मध्ये झालेल्या वन डे विश्वचषक स्पर्धेत मोहम्मद शमी सोबत धमाकेदार कामगिरी केली आहे. त्यानंतर त्याने जवळपास नऊ वर्ष एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही. हा खेळाडू म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून धोनीचा फेवरेट खेळाडू मोहित शर्मा आहे.

मोहित शर्माला मिळू शकते टी-20 विश्वचषक 2024 मध्ये संधी..

टी-20 विश्वचषक 2024 स्पर्धेत तब्बल 9 वर्षानंतर कम बॅक करणार 'हा' भारतीय खेळाडू?,निवड समिती आहे लक्ष देऊन....

मोहित शर्मा याने आयपीएल 2023 मध्ये गुजरात टायटन्स संघाकडून टी-20 क्रिकेट मध्ये एन्ट्री केली. 14 सामन्यात 27 विकेट घेऊन सर्वांना अचंबित केले. यंदाच्या हंगामात देखील त्याची दमदार कामगिरी सुरू आहे. सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात गुजरातला विजय मिळवून देण्यात त्याने महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यापूर्वी मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात देखील त्याने धमाकेदार कामगिरी केली होती. त्यामुळे येणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेमध्ये त्याला भारतीय संघात खेळण्याची संधी मिळू शकते.शिवाय निवड समितीने देखील आपण त्याच्यावर बारीक लक्ष ठेवून असल्याचे संकेत दिले आहेत.

मोहित शर्मा याचा परफॉर्मन्स जर असाच पुढे चालू राहिला तर, त्याला येणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी संधी मिळू शकते. नऊ वर्षानंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करताना दिसून येईल. मोहित वेस्टइंडीज आणि अमेरिका येथील मंद खेळपट्ट्यांवर  किफायतशीर ठरू शकतो . त्याच्याकडे जबरदस्त व्हेरिएशन आहे. तो स्लो बोल पण फेकतो यासह डेथ ओव्हर मध्ये अचूक यॉर्कर चेंडू टाकतो. बुमराह आणि अर्शदीप यांच्या सोबत राहून भारतीय गोलंदाजीची धुरा तो सांभाळू शकतो.

==== आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved. IPL 2024: मुंबई इंडियन्सने अचानक केला संघात बदल, या दिग्गज खेळाडूला बाहेर काढून या इंग्लंड च्या खेळाडूला दिली संधी. IPL 2024: यॉर्कर स्पेशालिस्ट ‘जसप्रीत बुमराह’ आयपीएलसाठी पूर्णपणे फिट; यंदाच्या आयपीएल मध्ये या तीन विक्रमावर असेल नजर…

मोहित शर्मा याने 2015 मध्ये एम एस धोनीच्या नेतृत्वाखाली वनडे आणि टी-20 क्रिकेटमध्ये शेवटचा सामना खेळला होता. 2013 मध्ये वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या मोहितने 26 सामन्यात 31 विकेट घेतले होते. त्यासोबत भारताकडून खेळताना 8 टी-20 सामन्यात 6 विकेट घेतल्याची नोंद आहे. आयपीएल मध्ये त्याने 103 सामन्यात 125 विकेट घेतल्याची नोंद आहे.


====

आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

 

IPL 2024: मुंबई इंडियन्सने अचानक केला संघात बदल, या दिग्गज खेळाडूला बाहेर काढून या इंग्लंड च्या खेळाडूला दिली संधी.

IPL 2024: यॉर्कर स्पेशालिस्ट ‘जसप्रीत बुमराह’ आयपीएलसाठी पूर्णपणे फिट; यंदाच्या आयपीएल मध्ये या तीन विक्रमावर असेल नजर…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here