आपल्या धारदार अशा गोलंदाजीने विरोधी संघाचे मनसुबे उधळून लावणारा भारताचा उजव्या हाताचा मध्यमगती वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत बेंचवर बसून आहे. अपार अनुभव असलेला हा भेदक गोलंदाज संघात स्थान न मिळाल्याने अद्यापही त्याला एकही सामना खेळता आला नाही.
एकेकाळी महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली या कर्णधाराचा फेवरेट असलेला हा खेळाडू रोहित शर्माच्या संघात मात्र फिट बसत असल्याचे दिसून येत नाही. खेळपट्टी कशीही असो विकेट घेण्यात माहेर असलेल्या शमीला रोहित शर्मा का संघात खेळवत नाहीये, हा अनेकांना पडलेला प्रश्न आहे.
दोन विश्वचषक स्पर्धा खेळण्याचा अनुभव असलेल्या शमीला जुना आणि नव्या चेंडूने स्विंग करण्याची कला अवगत आहे. विश्वचषक स्पर्धेत आत्तापर्यंत त्याने 11 सामन्यात तब्बल 31 बळी घेतले आहेत. 2019 साली अफगाणिस्तान विरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने हॅट्रिक देखील घेतली होती. 2023 विश्वचषक भारतात होत आहे. भारताने आत्तापर्यंत तीन सामने खेळले आहे या तिन्ही सामन्यात त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. भारतीय संघामध्ये तिसरा गोलंदाज म्हणून हार्दिक पांड्याला खेळवले जात आहे. त्यामुळे शमीला संघा बाहेर बसावे लागत आहे. खेळपट्टी वेगवान गोलंदाजाला अनुकूल असल्यावर रोहित शर्मा शार्दुल ठाकूरला संधी देतोय.
140 kmphच्या वेगाने गोलंदाजी करणाऱ्या मोहम्मद शमीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीवर एक नजर टाकली असता त्याने 94 वनडे क्रिकेटमध्ये 25.5 च्या सरासरीने 171 बळी घेतले आहे.
51 धावा देत पाच गडी बाद करण्याचा त्याने एकदा विक्रम केला होता तर 64 कसोटी सामन्यात 27.71 च्या सरासरीने 229 बळींची नोंद त्याच्या नावावर आहे. तर कसोटीत 56 धावा देत सहा गडी बाद करण्याचा त्याने पराक्रम केला होता. कसोटीत ही त्याची सर्वोच्च कामगिरी आहे.
भारताचा पुढचा सामना 19 ऑक्टोबर रोजी बांगलादेश विरुद्ध पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यात जसप्रीत बुमराहला विश्रांती मिळू शकते, असे झाल्यास त्याच्या जागेवर मोहम्मद शमीला संघात स्थान मिळू शकते. येणाऱ्या सामन्यात रोहित शर्माने संघात कोणताच बदल केला नाहीतर मोहम्मद शमीला विश्वचषकातील सर्व सामने बेंचवर बसून पहावे लागणार आहेत.
भारतीय संघ तुफान फार्मात असून सुरुवातीचे पहिले तीन सामने जिंकत विजयाचे हॅट्रिक नोंदवली आहे. भारत गुणतालिकेत सध्या तीन विजय मिळवत सहा गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.
- हेही वाचा:
- विश्वचषकात पहिल्याच चेंडूवर बाद झाले आहेत हे 6 फलंदाज; एक आहे भारताचा माजी प्रशिक्षक..ऑस्ट्रेलिया-इंग्लंड नव्हे तर भारतच आहे वनडेमध्ये,’चेस मास्टर’; तब्बल 18 वेळा पार केलाय 300 पेक्षा जास्त धावांचा स्कोर.अफगाणिस्तानी तरुणी विद्यार्थ्यांना वाटते विश्वचषकाचे मोफत तिकिटे? कोण आहे ही तरुणी
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिल विषयी मिळाली मोठी अपडेट; वाचा काय आहे बातमी