VIRAL VIDEO: मोहम्मद शमीने टाकला एवढा जबरदस्त योर्कर की, स्टंप उडून पडले लांब पाहून नाथन लायनचे उडाले होश, व्हिडीओ होतोय सोशल मिडीयावर तुफान व्हायरल..
IND VS AUS: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी अंतर्गत खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात मोहम्मद शमीने आपल्या धोकादायक गोलंदाजीने ऑस्ट्रेलियन फलंदाजांना चारीमुंड्या लावल्या. शमीने पहिल्या डावात 9 षटकांत 18 धावांत 1 बळी घेतला, तर दुसऱ्या डावात 4.3 षटकांत 13 धावांत 2 बळी घेतले.

शमीच्या जीवघेण्या चेंडूने नॅथन लायनला 8 धावांवर बाद केले, तर स्कॉट बोलंडला शून्यावर पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. शमीने लायनला एवढा धोकादायक यॉर्कर टाकला की, फलंदाजाचे भान हरपले.
हे दृश्य 31व्या षटकात पाहायला मिळाले. लायन 19 चेंडूत 2 चौकार मारत 8 धावा करून खेळत होता. या षटकात चौथ्या चेंडूवर लायन धाव घेऊन स्ट्राइकवर आला. शमीने या षटकातील शेवटचा चेंडू टाकताच त्याने तो अचूक यॉर्कर पडला नॅथन लायन स्वतःला वाचण्याआधीच त्याचा लेग स्टंप उखडला आणि हवेत जाऊन स्लिप्सवर उडून गेला.
A pacer's delight! 🔥🔥@MdShami11 uproots the stumps to get Nathan Lyon out as #TeamIndia are just one wicket away from victory in Nagpur 👌🏻
Follow the match ▶️ https://t.co/SwTGoyHfZx…#TeamIndia | #INDvAUS | @mastercardindia pic.twitter.com/ptFxk6ZIlc
— BCCI (@BCCI) February 11, 2023
शमीचा हा चेंडू इतका धोकादायक होता की तो स्टंपला लागताच काही फूट दूर पडला. शमीने शेवटचा विकेट म्हणून स्कॉट बॅलंडला बाद करत टीम इंडियाला एक डाव आणि 132 धावांनी मोठा विजय मिळवून दिला.
टीम इंडियाने तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात फलंदाजी करताना एकूण 400 धावा केल्या. त्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघ दुसऱ्या सत्रापर्यंत अवघ्या 91 धावांवर गारद झाला.
रविचंद्रन अश्विनने दुसऱ्या डावात 12 षटकात 37 धावा देत 5 बळी घेतले. तर जडेजाने 12 षटकात 2 बळी घेतले. अक्षरला दुसऱ्या डावात एक विकेट मिळाली. टीम इंडिया आता 17 जानेवारीपासून दुसरा सामना खेळणार आहे.
हेही वाचा:
या 5 गोलंदाजांनी आयपीएलमध्ये आतापर्यंत सर्वांत जास्त ‘नो बॉल’ फेकलेत..
.न्यूझीलंड पोहोचताच रस्त्यावर फिरायला लागले भारतीय खेळाडू, यजुवेन्द्र चहलने शेअर केलेले फोटो होताहेत व्हायरल..
या महिलेने हिटलरच्या तावडीतून 25000 ज्यू वंशाच्या मुलांची सुटका करून त्यांना नवजीवन दिले होते..