मोहम्मद शमी: विश्वचषक 2023 (World Cup 2023) मध्ये भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात खेळल्या जात असलेल्या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या किवी संघाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही, प्रथम मोहम्मद सिराजने डेव्हन कॉनवेची विकेट घेतली, त्यानंतर मोहम्मद शमीने आपल्या पहिल्याच षटकात न्यूझीलंडचा फलंदाज विल यंगला (Will Younक्लीन बोल्ड करून पॅव्हेलियनमध्ये पाठवले. मोहम्मद शमीचा विकेट घेतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
मोहम्मद शमीने विल यंगला केले जबरदस्त रित्या बोल्ड, व्हिडीओ होतोय व्हायरल.
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohmmad Shami) धर्मशाला येथे खेळल्या जात असलेल्या भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील विश्वचषक २०२३ मध्ये या विश्वचषकातील पहिला सामना खेळत आहे. डावाच्या 9व्या षटकात कर्णधार रोहित शर्माने त्याला गोलंदाजीसाठी बोलावले, शमीने त्याच्या पहिल्याच षटकात न्यूझीलंडचा फलंदाज विल यंगला (Will Young)बाद केले. मोहम्मद शमीने टाकलेला इनकमिंग चेंडू विल यंगला समजू शकला नाही आणि तो बोल्ड झाला. मोहम्मद शमी विल यंगला गोलंदाजी करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे
पहा व्हायरल व्हिडीओ
विश्वचषक 2023 चा 21 वा सामना भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात खेळला जात आहे, भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, कर्णधार रोहित शर्माचा निर्णय योग्य असल्याचे सिद्ध केले. भारतीय गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. न्यूझीलंड संघाला 273 धावावर सर्वबाद केल्याननंतर टीम इंडियाने फलंदाजीला सुरवात केली आहे. आता टीम इंडिया हा सामना जिंकू शकते का नाही, हे पाहणे रंजक ठरणार नाही.
हेही वाचा:
- विश्वचषकात पहिल्याच चेंडूवर बाद झाले आहेत हे 6 फलंदाज; एक आहे भारताचा माजी प्रशिक्षक..
- ऑस्ट्रेलिया-इंग्लंड नव्हे तर भारतच आहे वनडेमध्ये,’चेस मास्टर’; तब्बल 18 वेळा पार केलाय 300 पेक्षा जास्त धावांचा स्कोर
- .अफगाणिस्तानी तरुणी विद्यार्थ्यांना वाटते विश्वचषकाचे मोफत तिकिटे? कोण आहे ही तरुणी
- पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिल विषयी मिळाली मोठी अपडेट; वाचा काय आहे बातमी