‘मुसलमान असल्याचा अभिमान, कुठेही नमाज वाचेल,सजदा करेल..’; मैदानातील वादावर अखेर मोहम्मद शमीने दिले स्पष्टीकरण, केला मोठा खुलासा..

मोहम्मद शमी

मोहम्मद शमी: भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला आयसीसी विश्वचषक 2023 दरम्यान श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात पाच विकेट्स घेतल्यानंतर मैदानातनमाज वाचल्यामुळे काही लोकांनी ट्रोल केले होते. आता या प्रकरणावर आजतकवर बोलताना शमीने टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.

33 वर्षीय वेगवान गोलंदाज म्हणाला की, मला मुस्लिम असल्याचा अभिमान आहे, जिथे मला नमन करावे लागेल तिथे मी करेन, मला असे करण्यापासून कोण रोखेल.

ODI Records: 'या' 6 भारतीय दिग्गज गोलंदाजाने वन-डे क्रिकेटमध्ये घेतलेत सर्वाधिक बोल्ड विकेट.. मोहमद शमी

 

शमी म्हणाला,

“जर मला माझ्या धर्मातील पवित्र असा नमाज पाडायचा असेल मला कोण रोखू शकेल? मी कोणालाही त्यांच्या धर्मातील गोष्टी करण्यापासून  कधी रोकले नाहीये.  मग मला नमाज पाडायचा असेल तर. यात काय अडचण आहे? मी अभिमानाने सांगेन की मी मुस्लिम आहे. मी अभिमानाने सांगेन की मी भारतीय आहे.”

Highest Wicket taker bowler in World Cup History: एकदिवशीय विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक विकेट घेणारे 5 गोलंदाज..

शमी पुढे म्हणाला, “यात अडचण काय आहे? जर मला नमाज पढण्यासाठी कोणाची परवानगी मागायची असेल, तर मी या देशात का राहू? मी यापूर्वी  विकेट घेतल्यानंतर कधी मैदानात नमाज केला आहे का? तो दिवस माझ्यासाठी खास होता म्हणून मी माझ्या देवाला आठवून ते कार्य केले,. ज्यात मी काहीही चूक केल असं मला वाटत नाही. असेही यावेळी शमी म्हणाला.

'मुसलमान असल्याचा अभिमान, कुठेही नमाज पाडेल'; मैदानातील वादावर अखेर मोहमद शमीने दिले स्पष्टीकरण, केला मोठा खुलासा..

IPL AUCTION 2024: आई शेतमजूर तर बाप बांधकाम मजूर.. आयपीएलच्या मिनी लिलावात बिहारच्या ‘या’ तरुणाची चर्चा; धोनीला मानतो आदर्श..

नक्की काय होते मोहम्मद शमीचे श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातील प्रकरण?

ICC विश्वचषक 2023 च्या पहिल्या चार सामन्यांमध्ये शमी प्लेइंग 11 चा भाग नव्हता. मात्र, संघात सामील होताच शमीने न्यूझीलंडविरुद्ध पाच विकेट घेत आपली छाप सोडली. त्याच वेळी, श्रीलंकेविरुद्ध शमीने कहर केला आणि अवघ्या 18 धावांत पाच बळी घेतले. त्यानंतर त्याने मैदानावर नमाज पढली होती. ज्यामुळे काहीसा वाद निर्माण झाला होता. यामुळे शमीला त्यावेळी ट्रोलदेखील करण्यात आले होते. ज्यावर आता त्याने मोकळेपणाने आपली बाजू मांडली आहे.


हेही वाचा:

Taapsee Pannu Affair: अभिनेत्री तापसी पन्नूचे आहे या खेळाडूसोबत अफेअर, पहिल्यांदाच खुलेपणाने बोलत म्हणाली, ‘त्याच्यासोबतच्या नात्याचा अभिमान’

IPL 2024 Auction: स्मिथ किंवा पॅट कमिन्स नाही तर लिलावात ‘या’ खेळाडूवर लागू शकते आयपीएलच्या इतिहासातील सर्वांत मोठी बोली, आजवरचा सर्वांत महागडा खेळाडू ठरणे निच्छित..

शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *