IND vs AUS : 5 विकेट घेत मोहम्मद शमीने रचला महाविक्रम, ऑस्ट्रोलीयाविरूद्ध अशी कामगिरी करणारा ठरला पहिला गोलंदाज..
IND vs AUS: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवशीय सामन्याची मालिका आजपासून सुरु झाली आहे. पहिला सामना आज खेळवला जात आहे.ज्यात भारतीय संघाचा कर्णधार के.एल . राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आणि भारतीय गोलंदाजांनी हा निर्णय योग्य सिद्ध करत ऑस्ट्रोलियाच्या संघाला सर्वबाद केले.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने (Mohmmad Shami)आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. शमीने या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या अर्ध्या फलंदाजांना एकहाती पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. शमीच्या भेदक गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाला 50 षटकांचा खेळ संपल्यानंतर केवळ 276 धावाच करता आल्या. अशा स्थितीत भारताला विजयासाठी 277 धावांची गरज आहे. शमीने या सामन्यात 9.4 षटकात 44 धावा देत 5 विकेट घेतल्या आहेत.

IND vs AUS: मोहम्मद शमीने रचला इतिहास.
या सामन्यात शमीने 5 विकेट घेत 16 वर्षांपूर्वी केलेल्या विक्रमाची पुन्हा एकदा पुनरावृत्ती केली आहे. 16 वर्षांनंतर भारतात वनडेमध्ये पाच विकेट घेणारा शमी पहिला भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे. शमीची ही कामगिरी भारतीय संघासाठी शुभ संकेत आहे. बुमराह हा भारताचा सर्वात विश्वासार्ह गोलंदाज आहे, सिराज एकदिवसीय क्रिकेट क्रमवारीत पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज बनला आहे. या दोन धोकादायक गोलंदाजांनंतर शमीचाही या यादीत समावेश झाला आहे. शमीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 विकेट घेत विश्वचषक स्पर्धेसाठी पूर्णपणे तयार असल्याचे स्पष्ट केले आहे.
शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा भारतीय संघ 277 धावांचे लक्ष पूर्ण करण्यासाठी मैदानात उतरला आहे. सलामीवीर शुभमन गिल आणि ऋतुराज गायकवाड सध्या खेळपट्टीवर आहेत.
शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..