मियाभाई बोलते…!मोहम्मद सिराजने एकाच षटकात 4 गडी बाद करत मोडले हे 3 मोठे विक्रम, सोबतच अशी कामगिरी करणारा ठरला पहिला गोलंदाज..!

मियाभाई बोलते…! मोहम्मद सिराजने एकाच षटकात 4 गडी बाद करत मोडले हे 3 मोठे विक्रम, सोबतच अशी कामगिरी करणारा ठरला पहिला गोलंदाज..!


आशिया कप 2023 (Asia Cup 2023) चा अंतिम सामना भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यात कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात भारताच्या वेगवान गोलंदाजांनी शानदार सुरुवात केली आहे. विशेषत: मोहम्मद सिराज उत्कृष्ट गोलंदाजी करत आहे. या सामन्यात त्याने आतापर्यंत 4 धावांत 5 बळी घेतले आहेत. यासोबतच त्याने अनेक विक्रमही आपल्या नावावर केले आहेत, जे आजपर्यंत अनेक भारतीय महान गोलंदाज करू शकलेले नाहीत. सिराजच्या गोलंदाजीसमोर श्रीलंकेचे फलंदाज हतबल दिसत आहेत.

सिराजपुढे टेकले श्रीलंकेच्या फलंदाजांनी हात केवळ 4धावा देऊन 5 गडी बाद..!

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्यास उतरलेल्या टीम इंडियाने जबरदस्त गोलंदाजीचे प्रदर्शन दाखवले. या सामन्यात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने (Jasprit bumrah) पहिल्याच षटकात पहिली विकेट घेतली. बुमराहने श्रीलंकेचा सलामीवीर कुशल परेराला (kushal Parera) यष्टिरक्षक केएल राहुलकडे झेलबाद केले. त्यानंतर सिराजने डावाचे दुसरे षटक आणले आणि त्यात एकही धाव दिली नाही. सिराजने (Mohmmad Siraj) आपल्या चौथ्या आणि डावातील दुसऱ्या षटकात अप्रतिम गोलंदाजी केली.

IND vs SL ASIA CUP FINAL LIVE: मोहम्मद सिराज समोर श्रीलंकेचे फलंदाज ‘ढेर’, केवळ 18 धावांत गमावले ६ गडी; भारताच विजय जवळपास निच्छित..!

प्रथम त्याने पथुम निशांकला रवींद्र जडेजाच्या हाती झेलबाद केले. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर सदीरा समरविक्रमाला, चौथ्या चेंडूवर चरित असालंका आणि त्यानंतर षटकाच्या शेवटच्या चेंडूवर धनंजय डी सिल्वाला बाद करून त्याने एकाच षटकात ४ बळी घेतले आणि अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला.

उजव्या हाताच्या वेगवान गोलंदाजा ने शानदार गोलंदाजी करत आतापर्यंत एका मेडन षटकात 5 बळी घेतले आहेत. एकाच षटकात 4 बळी घेणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. त्यामुळे सिराज कमीत कमी चेंडूत 5 बळी घेण्याच्या बाबतीत संयुक्त पहिल्या स्थानावर पोहोचला आहे.

मोहम्मद सिराज

अवघ्या 16 चेंडूत त्याने ही कामगिरी केली. त्याच्याआधी श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज चामिंडा वासनेही 2003 साली बांगलादेशविरुद्ध 16 चेंडूत 5 विकेट घेतल्या होत्या. वनडेमध्ये सर्वात जलद 50 विकेट घेणारा सिराज हा चौथा भारतीय गोलंदाज ठरला आहे. त्याने 29 सामन्यांत 50 बळी पूर्ण केले आहेत. अजित आगरकर या बाबतीत अव्वल आहे, त्याने 23 सामन्यांमध्ये ही कामगिरी केली होती.

सिराजच्या घातक गोलंदाजीच्या जोरावर हा अंतिम सामना आता पूर्णपणे भारतीय संघाकडे झुकला आहे. आशिया कप 2023 वर भारतीय संघाचे नाव कोरले जाईल की नाही हे पाहणे रंजक ठरणार आहे.


हेही वाचा:

शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..

टेलेंट असूनही या 4 खेळाडूंना कधीही संघात जागा मिळाली नाही, एकाने तर केले होते जबरदस्त प्रदर्शन तरीही केवळ 2 वर्षचं टिकली क्रिकेट कारकीर्द..

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत.