जगातील नंबर 1 गोलंदाज बनल्यानंतर ‘मोहम्मद सिराज’ झाला भावूक, 2020 मध्ये निधन झालेल्या वडिलांच्या आठवणीमध्ये शेअर केली इमोशनल स्टोरी..

जगातील नंबर 1 गोलंदाज बनल्यानंतर मोहम्मद सिराज झाला भावूक, 2020 मध्ये निधन झालेल्या वडिलांच्या आठवणीमध्ये शेअर केली इमोशनल स्टोरी..


ICC ने 20 सप्टेंबर रोजी एकदिवशीय फोर्मेटमधील नवीनतम  ICC क्रमवारी जाहीर केली आहे. यावेळी भारतीय संघाचा स्टार युवा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने(Mohmmad Siraj) मोठी झेप घेत एकदिवसीय क्रमवारीत पहिले स्थान काबीज केले आहे. आशिया चषक स्पर्धेच्या (Asia Cup 2023) अंतिम सामन्यात शानदार गोलंदाजी करत 6 विकेट्स घेणारा सिराज आता एकदिवसीय क्रमवारीत गोलंदाजांच्या यादीचा बादशाह बनला आहे.

मोहम्मद सिराजच्या कामगिरीवर फिदा झाली ‘ही’ बॉलीवूड अभिनेत्री, स्वतः पोस्ट शेअर करत केली सिराजची स्तुती..

भारतीय संघाचा स्टार युवा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने (Mohmmad Siraj) त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक स्टोरी शेअर केली आहे. सिराजच्या स्टोरीमध्ये त्याचे वडील आणि आई एकत्र दिसत आहेत. वडिलांची आठवण करताना सिराजने या स्टोरीवर ‘मिस यू पापा’ लिहिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sports Tak (@sportstakofficial)

सिराजची ही कहाणी खूपच भावूक आहे. मोहम्मद सिराजचे वडील मोहम्मद यांचे 2020 मध्ये निधन झाले, वडिलांच्या निधनानंतर, सिराज अनेकदा त्यांची आठवण म्हणून त्यांचे छायाचित्र शेअर करतो. पण यावेळी तो प्रसंग खूप खास होता कारण तो एकदिवसीय क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला होता.

हेही वाचा: Asian Games 2023: शफाली वर्माने रचला इतिहास.. आशियाई खेळामध्ये अशी कामिगीरी करणारी ठरली पहिला महिला खेळाडू…

याआधी मोहम्मद सिराज आयसीसी वनडे गोलंदाजी क्रमवारीत नवव्या स्थानावर होता. मात्र आशिया चषकातील अप्रतिम कामगिरीमुळे त्याने 8 स्थानांनी झेप घेतली आणि थेट शीर्षस्थानी पोहोचला. सिराजच्या आधी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड (josh hazlewood) पहिल्या क्रमांकावर होता.

Asia Cup 2023: मोहम्मद सिराजने रचला इतिहास, क्रिकेटच्या 91 वर्षामध्ये कोणताही गोलंदाज करू शकला नव्हता अशी कामगीरी..!

मोहम्मद सिराज

सिराजचे सध्या ६९४ रेटिंग गुण आहेत तर हेजलवूडचे ६७८ रेटिंग गुण आहेत. सिराजशिवाय शुभमन गिल (Shubhman Gill) त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे वनडे फलंदाजी क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे. बाबर आझम अजूनही 857 रेटिंग गुणांसह वनडेत पहिल्या स्थानावर कायम आहे.


हेही वाचा:

शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..

टेलेंट असूनही या 4 खेळाडूंना कधीही संघात जागा मिळाली नाही, एकाने तर केले होते जबरदस्त प्रदर्शन तरीही केवळ 2 वर्षचं टिकली क्रिकेट कारकीर्द..

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत