वडील ऑटोचालक, घरी कायम गरिबी. तरीही मोहम्मद सिराजच्या वडिलांनी मुलाचे स्वप्न केले पूर्ण, कधी बाईकचे हफ्ते भरायला पैसे नसणारा सिराज आहे आहे करोडो रुपयांचा मालक..

By | September 18, 2023

वडील ऑटोचालक, घरी कायम गरिबी तरीही मोहम्मद सिराजच्या वडिलांनी मुलाचे स्वप्न केले पूर्ण, कधी बाईकचे हफ्ते भरायला पैसे नसणारा सिराज आहे आहे करोडो रुपयांचा मालक..


मोहम्मद सिराजने आशिया कप 2023 च्या अंतिम फेरीत आपल्या गोलंदाजीने सर्वांची मने जिंकली. सिराजने श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या विजेतेपदाच्या लढतीत 6 विकेट घेत यजमान संघाच्या फलंदाजांची बोलतीच बंद केली. त्याच्या या कामगिरीमुळे भारतीय संघाने आशिया चषकाचे विजेतेपद पटकावले. सिराज आज भलेही स्टार असेल पण त्याचे बालपण संघर्षमय होते.

मोहम्मद सिराज आज करोडोंच्या मालमत्तेचा मालक असेल पण लहानपणापासून असे नव्हते. सिराजचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला. त्याचे वडील रिक्षाचालक होते आणि आई घरकाम करत होती. सिराजला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती आणि तो क्रिकेट अकादमीमध्ये मामासोबत खेळत असे. एके दिवशी त्याने 9 विकेट घेतल्या, त्यानंतर प्रत्येकाला या गेममध्ये त्याचे भविष्य दिसू लागले.

मोहम्मद सिराज

पंक्चर काढण्यासाठी मित्रांकडून उधार घ्यायचे.

सिराजच्या वडिलांकडे साधनसंपत्ती कमी असतानाही त्यांनी आपल्या मुलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. त्याने सिराजला त्याच्या घरापासून दूर असलेल्या एका चांगल्या क्रिकेट अकादमीत दाखल केले. त्यासाठी सिराज हा दुचाकीने जात असे.

मोहम्मद सिराज

Mohmmad siraj’s father

या स्टार बॉलरने एका मुलाखतीत सांगितले होते की, त्याचे वडील त्याला दररोज ७० रुपये द्यायचे, त्यातील ६० रुपये पेट्रोलवर खर्च करायचे आणि उरलेले १० रुपयेस्वतः चहा पाणी साठी वापरायचा. अशा परिस्थितीत जेव्हा जेव्हा टायर पंक्चर होत होते तेव्हा, त्याला मित्रांकडून पैसे घ्यावे लागत होते.

रणजी, आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करून नशीब पालटले.

Mohammed Siraj  ipl career

Mohammed Siraj ipl career

जरी लोक मोहम्मद सिराजला त्याच्या आयपीएलमधील कामगिरीवरून ओळखतात. मात्र या स्पर्धेपूर्वी त्याने रणजी ट्रॉफीमध्ये आश्चर्यकारक कामगिरी केली होती. 2016 मध्ये आरसीबीसाठी ‘नेट बॉलर’ म्हणून काम करणाऱ्या सिराजला आधी सनरायझर्स हैदराबाद आणि नंतर आरसीबीकडून खेळण्याची संधी मिळाली. सिराजने या संधीचे सोने करत आणि झटपट विकेट घेत टीम इंडियातील आपले स्थान पक्के केले. आज तो एकदिवसीय क्रमवारीत भारताचा अव्वल गोलंदाज आहे.


हेही वाचा:

शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..

टेलेंट असूनही या 4 खेळाडूंना कधीही संघात जागा मिळाली नाही, एकाने तर केले होते जबरदस्त प्रदर्शन तरीही केवळ 2 वर्षचं टिकली क्रिकेट कारकीर्द..

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *