शुभमन गिल आधी रोहित शर्माने ‘या’ 5 खेळाडूंवर सुद्धा भर मैदानात काढलाय राग, एकाला तर भर मैदानात खडसावले होते..

शुभमन गिल आधी रोहित शर्माने 'या' 5 खेळाडूंवर सुद्धा भर मैदानात काढलाय राग, एकाला तर भर मैदानात खडसावले होते..

रोहित शर्मा: भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यात 3 T20 सामन्यांची मालिका खेळली जात आहे .या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारतीय संघाने अफगाणिस्तान संघाचा पहिल्या दोन सामन्यात पराभव करून ही मालिका जिंकली आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मा शुभमन गिलमुळे बाद झाला, त्यानंतर त्याने मैदानाच्या मध्यभागी भारतीय फलंदाजाला ओरडण्यास सुरुवात केली.

या घटनेनंतर रोहित शर्माच्या त्या घटनांचा उल्लेख केला जात आहे, ज्यात त्याने मैदानाच्या मध्यभागीच राग दाखवला होता. चला तर या विशेष लेखाच्या माध्यमातून अश्या घटनांविषयी जाणून घेऊया जेव्हा कर्णधार रोहित शर्माला भर मैदानात राग अनावर झाला होता.

Viral Video: शून्यावर बाद होताच रोहित शर्माला राग अनावर, भरल्या मैदानात शुभमन गिलला झापले; व्हिडीओ सोशल मिडीयावर होतोय तुफान व्हायरल..

  कर्णधार रोहित शर्मा मैदानातच या खेळाडूंवर रागावला होता.

१.शुभमन  गिल:

टीम इंडियाचा सध्याचा कर्णधार रोहित शर्मा जेव्हा अफगाणिस्तानसोबत खेळल्या जात असलेल्या 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात शुभमन गिलच्या चुकीमुळे धावबाद झाला तेव्हा, त्याचे रागावरील नियंत्रण सुटले आणि शुभमनला त्याने मैदानावरच खडसावले.  त्यानंतर आता भारतीय कर्णधाराच्या त्या घटनांचा उल्लेख केला जात आहे, जेव्हा त्याने मैदानाच्या मध्यावरच राग व्यक्त केला.

IND vs AFG: "राग आला होता मात्र..." सामना संपल्यानंतर रणआऊटबद्दल रोहित शर्माने केला मोठा खुलासा, शुभमनला दिला असा सल्ला..!

२.अर्शदीप सिंग:

याआधी रोहित शर्माने आशिया चषक २०२२ मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात झेल सोडल्याबद्दल संघाचा युवा वेगवान गोलंदाजअर्शदीप सिंगला मैदानामध्येच झापले होते. या वेळी अर्शदीप सिंगने निर्णायक सामन्यात महत्वाचा असा झेल सोडला होता, ज्यामुळे रोहित शर्माला राग अनावर झाला.

3.स्टीव्ह स्मिथ:

रोहित शर्माचा एकदा कसोटी सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथसोबत मैदानाच्या मध्यभागी वाद झाला होता. हा वाद एवढा मोठा होता की, कर्णधार रोहित शर्माचे स्वतःवरील नियंत्रण सुटले होते.

४. भुवनेश्वर कुमार:

2022 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या जात असलेल्या घरच्या टी-20 मालिकेत भारतीय वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने कॅरेबियन फलंदाजाचा झेल सोडला होता, त्यानंतर रोहित शर्माने भुवीला जाहीरपणे फटकारले होते. भूमीला सुद्धा आपल्याकडून झालेल्या चुकीची जाणीव झाली आणि त्याने हे शांतपणे ऐकून घेतले होते.

शुभमन गिल आधी रोहित शर्माने 'या' 5 खेळाडूंवर सुद्धा भर  मैदानात काढलाय राग, एकाला तर भर मैदानात खडसावले होते..

५.केएल राहुल:

बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मानेही यष्टिरक्षक केएल राहुलला झेल सोडल्याबद्दल चांगलेच खडसावले होते. रोहित शर्माच्या या घटनांची  सध्या खूप जास्त चर्चा होत आहे.

रोहित शर्माने प्रदीर्घ कालावधीनंतर अफगाणिस्तानविरुद्ध  T20 मध्ये पुनरागमन केले.

शुभमन गिल आधी रोहित शर्माने 'या' 5 खेळाडूंवर सुद्धा भर  मैदानात काढलाय राग, एकाला तर भर मैदानात खडसावले होते..

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात (IND vs AFG) खेळल्या जात असलेल्या 3 T20 सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा 14 महिन्यांनंतर कर्णधार म्हणून T20 फॉर्मेटमध्ये परतला आहे. ही मालिका आतापर्यंत कर्णधारासाठी चांगली ठरलेली नाही, पहिल्या सामन्यात तो शुभमन गिलच्या चुकीमुळे धावबाद झाला, तर दुसऱ्या सामन्यात पहिल्याच चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात तो शून्यावर बाद झाला. बंगळुरू येथे होणाऱ्या सामन्यात तो चांगली कामगिरी करेल अशी आशा चाहत्यांना आहे.


हेही वाचा:

विराट कोहलीला भेटण्यासाठी सुरक्षा तोडून मैदानात आलेला चाहता अडचणीत, आता जावे लागणार थेट तुरुंगात, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

Viral Video: शिवम दुबे ने ठोकले एवढे जबरदस्त षटकार की, कर्णधार रोहित शर्माआणि विराट कोहलीही झाले चकित, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *