आयपीएल 2024

IPL 2024 TIMETABLE: ठरलं.. या दिवशी खेळवला जाणार आयपीएल 2024 चा पहिला सामना, पहा संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन..

IPL 2024 TIMETABLE: जगातील सर्वांत यशस्वी टी-20 स्पर्धा म्हणून इंडियन प्रीमियर लीग (IPL) कडे पहिले जाते. आयपीएलचे आतापर्यंत 16 हंगाम खेळवले गेले आहेत तर 17 वा हंगाम आता खेळवला जाणार आहे. 17व्या हंगामासाठी बीसीसीआयने काही दिवसापूर्वीच मिनी लिलावाचे आयोजन केले होते. ज्यात ऑस्ट्रोलियाच्या खेळाडूवर करोडो रुपयांची बोली लागली.

IPL 2024 TIMETABLE: या तारखेपासून सुरु होऊ शकते आयपीएल 2024

आता आयपीएलचा 17 वा हंगामा कधीपासून सुरु होणार? याची चाहते वाट पाहत असतांना बीसीसीआयने याबद्दल एक निवेदन जरी केले आहे. बीसीसीआयच्या योजेनुसार आयपीएल 2024 (IPL 2024) या वर्षी मार्चच्या अखेरीस सुरु होऊ शकते. मार्च मधील 22 तारीख या महा लीगच्या ओपनिंग सामन्यासाठी निच्छित केली असल्याचं समोर आलं आहे.

IPL 2024 TIMETABLE आरसीबीच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी..! विराट कोहली पुन्हा होऊ शकतो आरसीबीचा कर्णधार, समोर आलीय मोठी माहिती..!

तर महिला प्रीमियर लीग (WPL 2024) फेब्रुवारीच्या 16 तारखेनंतर आयोजित केले जाणार आहे.

 IPL 2024: निवडणुकांमुळे आयत्या वेळी सामन्यांची ठिकाणे बदलू शकणार.

आयपीएल आणि देशातील लोकसभा निवडणूक  जवळपास सारख्याच वेळी येत आहेत. अश्या स्थितीमध्ये बीसीसीआयने एक वेगळा प्लान सुद्धा तयार केला आहे. जर निवडणुका मागे किंवा पुढे नाही झाल्या तर असे सांगितले जात आहे की, ज्या टप्प्यात आयपीएल होस्टिंग शहरांमध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत, तेथील सामने इतर ठिकाणी आयोजित केले जातील. त्याच वेळी, पुढील टप्प्यातील निवडणुका ज्या ठिकाणी होतील त्या ठिकाणांचे सामने इतर ठिकाणी आयोजित केले जातील.

IPL LATEST NEWS च्या वृत्तानुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह आणि गृहमंत्री अमित शाह भारतात हा महत्त्वाचा कार्यक्रम यशस्वीपणे आयोजित करण्यासाठी एकत्र काम करत आहेत. रिपोर्टनुसार, 22 मार्चपासून आयपीएल सुरू होण्याची शक्यता आहे. यापूर्वी 2009 आणि 2014 मध्ये परदेशात आयपीएलचे आयोजन करण्यात आले होते, परंतु यावेळी निवडणुका असूनही सर्व सामने भारतातच होणार आहेत.

IPL 2024 TIMETABLE: ठरलं.. या दिवशी खेळवला जाणार आयपीएल 2024 चा पहिला सामना, पहा संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन..

WPL 2023 कधीपासून होणार सुरु?

दुसरीकडे, डब्ल्यूपीएलचा दुसरा हंगाम यावेळी दिल्ली आणि बेंगळुरूमध्ये आयोजित केला जाईल. गेल्या मोसमात सर्व सामने मुंबईत झाले, ज्यात मुंबई इंडियन्सने विजेतेपद पटकावले. डब्ल्यूपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, गुजरात जायंट्स, मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स या पाच संघांचा समावेश आहे.


हेही वाचा:

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button