- Advertisement -

जगातील हे तीन गोलंदाज, ज्यांच्या विचित्र गोलंदाजीच्या अ‍ॅक्शन ला घाबरून अनेक दिग्गज फलंदाज फलंदाजी ला घाबरतात.

0 3

 

 

 

क्रिकेट च्या दोन बाजू आहेत एक फलंदाजी आणि दुसरी गोलंदाजी. क्रिकेट मध्ये फलंदाजी आणि गोलंदाजी शिवाय फिल्डींग खूप गरजेचे आहे. हे दोन्ही एकमेकांवर अवलंबून आहे. आपल्या देशातील सर्वधील लोक क्रिकेट चे वेडे आहेत.

प्रत्येक खेळाडूंची खेळण्याची आपली युनिक स्टाईल असते. फलंदाजी आणि गोलंदाजी मध्ये वेगवेगळी कौशल्ये असतात. आणि प्रत्येक खेळाडू कडे ती वेगवेगळी असतात.

 

तर मित्रांनो आज आम्ही या लेखात तुम्हाला अश्या गोलंदाजांबद्दल सांगणार आहे ज्यांच्या गोलंदाजीच्या अँक्शन बघूनच फलंदाज भयभीत होतात. असे हे 3गोलंदाज कोण आहेत ते जाणून घेऊया.

 

 

सोहेल तन्वीर:-

सोहेल हा पाकिस्तान संघाचा अत्यंत वेगवान गोलंदाज आहे, त्याने 2007 च्या विश्वचषकातही सोहेल ने शानदार गोलंदाजी केली होती. त्याने आयपीएलच्या पहिल्या सत्रात अप्रतिम गोलंदाजी करत पर्पल कॅपही जिंकली होती. सोहेल तन्वीरला त्याच्या उंचीचा खूप फायदा होत असे, त्यामुळे फलंदाजांना त्याचे चेंडू समजण्यात अडचणी येत होत्या.

 

 

पॉल अॅडम्स:-

 

पॉल अॅडम्सची गोलंदाजी आजपर्यंत अनेक फलंदाजांना समजलेली नाही. त्याच्यासारखा अनोखा अ‍ॅक्शन असलेला दुसरा गोलंदाज नाही. त्यामुळे अनेक फलंदाज पॉल सोबत खेळायला घाबरतात. खेळपट्टी बघून तो न वळता डोक्याजवळ हात फिरवून चेंडू सोडायचा आणि त्याची कृती पाहून लोक अनेकदा हसायचे. दुखापतीमुळे त्याची कारकीर्द फार लांबली नसली तरी.

 

 

लसिथ मलिंगा:-

 

श्रीलंकेचा माजी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाही त्याच्या विचित्र गोलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे अत्यंत युनिक स्टाईल ने गोलदाजी करत अनेक दिग्गज खेळाडू मलिंगा ने बाद केले आहेत. त्याच्या गोलंदाजीच्या कृतीला विस्डेनने स्लिंगिंग म्हटले होते. तो चेंडू अगदी बाहेर सोडायचा. पण त्याचा चेंडू थेट विकेटवर यायचा. मलिंगाची क्रिकेट कारकीर्द जबरदस्त होती.

Leave A Reply

Your email address will not be published.